Mumbai Police: कोरोना संशयित पोलीस कर्मचाऱ्याला रुग्णालयात सुविधा उपलब्ध नसल्याच्या व्हायरल व्हिडिओेचे मुंबई पोलिसांकडून खंडण

कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर डॉक्टर,वैद्यकीय कर्मचारी, पोलीस कर्मचारी आणि सफाई कामगार आपला जीव धोक्यात घालून आपले कर्तव्य बजावत आहेत.

Mumbai Police Logo | (Photo Credits: File Image)

कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर डॉक्टर,वैद्यकीय कर्मचारी, पोलीस कर्मचारी आणि सफाई कामगार आपला जीव धोक्यात घालून आपले कर्तव्य बजावत आहेत. दरम्यान, एका पोलीस कर्मचाऱ्यामध्ये कोरोनाचे लक्षणे दिसून आली. मात्र, त्यांना रुग्णालयात दाखल करून घेण्यात आले नाही, असा आरोप संबंधित पोलीस कर्मचाऱ्यांच्या पत्नीने एका व्हिडिओच्या माध्यामातून केला होता. त्यानंतर हा व्हिडिओ सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. व्हिडिओ पाहून अनेकांनी रुग्णालय प्रशासनाबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. मात्र, हा व्हिडिओ चुकीचा आहे, असे दावा मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) केला आहे. कोविड पॉझिटिव्ह पोलीस कर्मचाऱ्याने स्वत: वरिष्ठांना घरी राहण्याची विनंती केली होती, असेही स्पष्टीकरण त्यांनी दिले आहेत.

भाजप आमदार राम कदम यांनी या महिलेचा व्हिडीओ पोस्ट केला होता. या व्हिडिओत संबंधित पोलीस कर्मचाऱ्यांची पत्नी सांगत आहे की, त्यांच्या पती गेल्या अनेक दिवसांपासून आजारी असून त्यांना श्वसनात सुद्धा त्रास जाणवत आहे. दरम्यान, त्यांची कोरोना चाचणी करण्यात आली आहे. परंतु, कोरोनाचा अहवाल न आल्याने त्यांना कोणतेही रुग्णालय दाखल करुन घेण्यास नाही. खाजगी रुग्णालयात 80 हजार ते 1 लाख रुपये खर्च सांगितला जात आहे, जो देणे आम्हाला शक्य होणार नाही. यामुळे त्यांच्या जीवाला धोका आहे. यामुळे सरकारने यात लक्ष घालावे, अशी विनंती या महिलेने या व्हिडिओच्या माध्यमातून केली आहे. या व्हडिओ वर मुंबई पोलिसांनी स्पष्टीकरण दिले आहे. आमच्या एका कोव्हीड पॉझिटिव्ह पीएसआयचा व्हिडिओ प्रसारित केला जात आहे. तसेच त्यांना रुग्णालयाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली नाही, असा आरोपही केला जात आहे. कृपया लक्षात घ्या की त्यांनी स्वतः वरिष्ठांना घरी राहण्याची विनंती केली होती. सध्या त्यांना रूग्णालयात दाखल करण्यात आले असून त्याच्यावर उपचार सुरु आहेत. हे देखील वाचा- मुंबई पोलिसाच्या पत्नीने मांडली व्यथा, 'पतीला श्वसनाचा त्रास होतोय मात्र कोरोना रिपोर्ट हाती नसल्याने हॉस्पिटल सहकार्य करत नाही' (Watch Video)

मुंबईचे पोलिसांचे ट्वीट-

कोरोनाची साखळी तोडण्यात महत्वाची भुमिका बजावणारे महाराष्ट्र पोलीस कर्मचारीही कोरोनाच्या जाळ्यात अडकत चालले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, महाराष्ट्र पोलीस दलातील 2 हजारांहन अधिक कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. तसेच 33 पोलीस कर्मचाऱ्यांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.