Mumbai Police Constable Injected With Poison: मोबाईल चोराचा पाठलाग करणार्‍या कॉन्स्टेबलच्या पाठीत खुपसलं विषारी इंजेक्शन; 3 दिवसांच्या उपचारानंतर पोलिस कर्मचार्‍याचा मृत्यू

अज्ञाता विरूद्ध गुन्हा दाखल केला. ही तक्रार जीआरपी दादर कडे वर्ग केली.

Death PC PIXABAY

मुंबई पोलिस दलात Local Arms unit मधील 30 वर्षीय कॉन्स्टेबलचा मृत्यू झाला आहे. रेल्वे ट्रॅकवर मोबाईल फोन चोरि प्रकरणात तो चोरांकडून पुन्हा घेण्यासाठी प्रयत्न करत असताना चोरांच्या टोळक्यांनी आणि ड्रग अ‍ॅडिक्ट्सनी विषारी पदार्थ पोलिसाच्या शरीरात इंजेक्ट केला. त्यानंतर पोलिस कॉन्स्टेबलवर उपचार सुरू असताना त्याची प्राणज्योत मालवली आहे. मृत पोलिस कॉन्स्टेबलचं नाव विशाल पवार आहे. तो ठाण्याचा रहिवासी आहे. ठाण्यातच त्याच्यावर उपचार सुरू होते पब उपचारादरम्यान त्याचा 1 मे दिवशी मृत्यू झाला आहे. त्याची 3 दिवस मृत्यूशी झुंज सुरू होती.

दरम्यान ही घटना 28 एप्रिलच्या रात्रीची आहे. 9.30 च्या सुमारास पोलिस लोकल मध्ये ड्युटीवर साध्या कपड्यांमध्ये जात असताना हा प्रकार घडला. विशाल पवार दरवाज्यामध्ये उभा राहून फोन वर बोलत होता. अशी माहिती अधिकार्‍यांनी दिली आहे.

सायन आणि माटुंगा दरम्यान जेव्हा ट्रेन स्लो झाली तेव्हा ट्रक जवळ असलेल्या एका व्यक्तीने त्याच्या हातावर फटका मारला. त्यामुळे फोन खाली पडला. आरोपीने फोन घेऊन पळण्यास सुरूवात केली. ट्रेन अजून थोडी स्लो झाल्यानंतर पवार देखील खाली उतरून ट्रॅक वरून पळायला लागला. नंतर त्याच्या भोवती काही चरसी लोकांचा घोळका आला. त्यांच्यामध्ये हाणामारी झाली. पवारांना त्यांनी मारहाण केली.

अधिकार्‍यांनी दिलेल्या माहितीनुसार,'मारहाणी दरम्यानच एकाने पवार यांच्या पाठीमागून विषारी इंजेक्शन खुपसलं. त्यांच्या तोंडातही लाल रंगाचे काही द्रव्य ओतलं. त्यानंतर पवार बेशुद्ध झाले. दुसर्‍या दिवशी त्यांना सकाळी शुद्ध आली आणि ते घरी गेले. मात्र त्यांची हालत खराब झाल्याने त्यांच्या कुटुंबियांनी त्यांना ठाण्यात हॉस्पिटल मध्ये नेले.

कोपरी पोलिस स्टेशनच्या अधिकार्‍यांनी त्यांचा जबाब नोंदवून घेतला. अज्ञाता विरूद्ध गुन्हा दाखल केला. ही तक्रार जीआरपी दादर कडे वर्ग केली. उपचारादरम्यान त्यांची प्रकृती ढासळत गेली आणि 3 दिवसांतच त्यांचा मृत्यू झाला. आता जीआरपी अधिकार्‍यांकडून तपास जारी करण्यात आला आहे. सध्या आरोपींचा कसून शोध घेतला जात आहे.