Ganeshotsav 2024: मुंबई पोलिसांना वर्दी मध्ये असताना ढोल ताशाच्या तालावर नाचण्यास Mumbai Police Commissioner Vivek Phansalkar यांची मनाई; कडक कारवाईचे निर्देश

कुणीही मुंबई पोलिस कर्मचारी थिरकताना दिसल्यास त्याच्यावर कारवाई होऊ शकते.

Mumbai Police | File Image

महाराष्ट्रामध्ये आज पासून गणेशोत्सव 2024 (Ganeshotsav 2024) ची सुरूवात झाली आहे. घराघरात आणि सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांमध्येही आता बाप्पा विराजमान झाला आहे. पुढील दहा दिवस बाप्पाचा सोहळा असणार आहे. या पार्श्वभूमीवर मुंबई पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. गणेशोत्सवाच्या आनंदाला गालबोट लागू नये म्हणून विशेष खबरदारी घेतली जात आहे. बाप्पाच्या आगमन आणि विसर्जनाला मिरवणूकींचा थाट असतो. पण यामध्ये पोलिसांची खादी अंगावर असताना कुणीही कर्मचार्‍याने नाचणं टाळावं अशा सूचना मुंबई पोलिस आयुक्त विवेक फणसळकर (Mumbai Police Commissioner Vivek Phansalkar) यांनी दिल्या आहेत. वर्दीचा मान राखण्याच्या उद्देशाने हा निर्णय घेण्यात आला आहे.

मुंबई पोलिस आयुक्तांच्या आदेशानुसार, पोलिसांनी ढोल ताशाच्या तालावर गणवेशामध्ये असताना टाळावं. कुणीही मुंबई पोलिस कर्मचारी थिरकताना दिसल्यास त्याच्यावर कारवाई होऊ शकते. दरम्यान गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर सुरक्षा आणि बंदोबस्ताच्या आढावा बैठकीमध्ये त्यांनी हा निर्णय घेतला आहे. पोलिसांनी त्यांच्या कामामध्ये प्रामाणिकपणे लक्ष घालावं, कुठेही गैरप्रकार घडणार नाही याची काळजी घेण्याचं आवाहन केले आहे. Artificial Ponds for Ganesh Immersion in Mumbai: गणपती विसर्जनासाठी BMC 200 हून अधिक कृत्रिम तलाव उभारणार; Google Maps वर पाहता येणार तलावांची यादी .

दरम्यान मुंबई गणेशोत्सवाच्या काळात 24 तास बाप्पाच्या सेवेमध्ये असते. अनेक मोठ्या मंडळांमध्ये दिवसरात्र भक्तांचा ओघ सुरू असतो. मागील काही दिवसांत महिलांवरील वाढत्या अत्याचारांच्या घटना पाहता आता महिलांच्या सुरक्षेकडे विशेष लक्ष ठेवले जात आहे. पोलिसांनी देखील महिलांना दक्ष राहण्याचे आवाहन केले आहे.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif