मुंबई येथील घाटकोपर परिसरात लॉकडाउनचे उल्लंघन; 'समोसा पार्टी'चे आयोजन करणाऱ्यांवर गुन्हा दाखल

कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर केंद्र आणि राज्य सरकारच्या आदेशांचे पालन करणे अधिक गरजेचे असताना मुंबई येथील घाटकोपर परिसरात सर्वांच्या भुवया उंचवणारा प्रकार घडला आहे.

Ghatkopar (Photo Credit: Twitter)

कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर केंद्र आणि राज्य सरकारच्या आदेशांचे पालन करणे अधिक गरजेचे असताना मुंबई येथील घाटकोपर परिसरात सर्वांच्या भुवया उंचवणारा प्रकार घडला आहे. लॉकडाऊनच्या काळात समोस पार्टीचे आयोजन करून लॉकडाउनच्या नियमाचे उल्लंघन केल्याप्रकरणी घाटकोपर येथील पंतनगर पोलिसांनी एका हाउसिंग सोसायटीच्या सदस्यांवर कारवाई केली आहे. सोमवारी सोशल मीडियावर घाटकोपर येथील एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. या व्हिडिओत कुकरेजा पॅलेसच्या आवारात 20 ते 30 जण एकत्र जमून समोसा पार्टी करत असल्याचे दिसत आहेत. त्यानंतर पोलिसांनी ही कारवाई केली आहे, अशी माहिती पोलीस आयुक्त परमजित दहिया यांनी दिली आहे.

सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या व्हिडिओत एक व्यक्ती गिटार वाजवत आहे. तसेच काही जण समोस्यांचे वाटत करत असल्याचे दिसत आहेत. दरम्यान, काही महिलांचाही या व्हिडिओत समावेश आहे. त्यापैंकी काही जणांनी मास्क परिधान केले आहेत, तर काहीजण विना मास्क आहेत. सोमवारी दुपारी हा प्रकार घडला आहे. पंतनगर पोलिसांच्या कारवाईनंतर हा व्हिडिओ व्हायरल होणे बंद झाले आहे, अशी माहिती पंतनगर पोलिसांनी दिली आहे. महत्वाचे म्हणजे, भाजपचे नेते प्रकाश मेहता देखील या सोसासटीमध्ये राहत असल्याचे कळत आहे.   हे देखील वाचा- चिंताजनक! महाराष्ट्रात गेल्या 24 तासांत 55 पोलिसांना COVID-19 ची लागण, एकूण संख्या 1328 वर

ट्वीट- 

कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर सरकार सतत जनजागृती करूनही नागरिकांच्या हलगर्जीपणामुळे राज्यात रुग्णांची संख्या वाढत चालली आहे. देशात संचारबंदी असूनही अनेक ठिकाणी लोक खरेदी किंवा इतर कारणांमुळे घराबाहेर पडत आहेत. प्रशासनाकडून कडक कायदे करूनही लोकांच्या हालचालींवर नियंत्रण ठेवणे कठीण झाले आहे. तसेच राज्य सरकार आणि केंद्र सरकारच्या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या लोकांवरही कारवाई केली जात आहे.