MLA Abu Azmi: कोरोना नियमांचे उल्लंघन; सपा आमदार अबू आझमी यांच्यासह 18 जणांवर गुन्हा दाखल
कोरोना नियमांचे उल्लंघन आणि तलवारीने केक कापणे असे आझमी यांच्यावर आरोप आहेत. या आरोपांवरुनच त्यांच्यावर कारवाई करत गुन्हा दाखल करण्यात आल्याचे मुंबईतील शिवाजीनगर पोलिसांनी सांगितले.
समाजवादी पक्षाचे (Samajwadi Party) आमदार अबू आझमी (MLA Abu Azmi) यांच्यासह 18 जणांवर मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) गुन्हा दाखल केला आहे. कोरोना नियमांचे उल्लंघन आणि तलवारीने केक कापणे असे आझमी यांच्यावर आरोप आहेत. या आरोपांवरुनच त्यांच्यावर कारवाई करत गुन्हा दाखल करण्यात आल्याचे मुंबईतील शिवाजीनगर पोलिसांनी सांगितले. अबू आजमी आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी एकत्र येत आपला वाढदिवस साजरा केला. या वेळी कोरोना नियमांचे मोठ्या प्रमाणावर उल्लंघन झाल्याची, माहिती पोलिसांना मिळाली होती. प्राप्त माहितीनुसार पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत कारवाई केली. आजमी हे मानखुर्द शिवाजी नगर विधानसभा मतदारसंघातून समाजवादी पक्षाचे आमदार आहेत.
पोलिसांनी प्रसारमाध्यमांना माहिती देताना सांगितले की, रविवारी सायंकाळी पाच ते रात्री साडेआठ वाजणेच्या सुमारास गोवंडी येथील शिवाजीनगर परिसरात विविध ठिकाणी आजमी यांनी आपल्या कार्यकर्त्यांसोबत वाढदिवस साजरा केला होता. वाढदिवसाचा आनंद साजरा करताना कोरोना नियमांचे उल्लंघन झाले. तसेच, तलवारीने केक कापल्याेन कायद्याचेही उल्लंघन झाले. पोलिसांनी पुढे सांगितले की, गर्दी जमवली असताना अनेकांनी तोंडाला मास्कही घातला नव्हता. (हेही वाचा, Coronavirus: आमदार अबू आजमी यांच्या विरोधात गुन्हा दाखल; Lockdown नियम उल्लंघन, वरिष्ठ महिला पोलीस निरीक्षकांना अपशब्द वापरल्याचा आरोप)
कोणाकोणावर गुन्हा दाखल?
- अबू असिम आझमी (आमदार )
- फहाद खान उर्फ आझमी
- इरफान खान
- गैसउददिन शेख,
- आयशा खान
- अक्तर कुरेशी
- मनोज सिंग
- सद्दाम खान
- तौसीफ खान
- जावेद सिद्दिकी
- नौशाद खान
- वसिम जाफर शेख
- अकबर खान
- इर्शाद कुरेशी ऊर्फ बबलू लोटस
- रईसा सय्यद
- शेहजाद ऊर्फ सय्यद
- शकील पठाण
- रुक्साना सिद्दिकी
दरम्यान, वाढदिवसाची गर्दी जमवल्याची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले. पोलिसांनी एका कार्यकर्त्याकडून तलवार जप्त केली. पोलिसांनी आरोपींवर भारतीय दंड संहिता कलम 188 आणि 269 अन्वये तसेच, बेकायदेशीर शस्त्र बाळगणे यांसह विविध कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे.