Sachin Waze ची मुंबई पोलिस दलातून हाकलपट्टीच्या कारवाईला सुरूवात - सुत्रांची माहिती
सूत्रांच्या माहितीनुसार, कागदपत्र मिळाल्यानंतर विशेष शाखेकडून नुकतीच संविधान मधील कलम 311 अंतर्गत सचिन वाझेची मुंबई पोलिस दलातून हाकलपट्टी करण्यासाठी सुरूवात झाली आहे.
मुंबई मध्ये उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या निवास स्थानाजवळ स्फोटकांनी भरलेली बॅग ठेवल्याप्रकरणी आणि मनसुख हिरेन (Mansukh Hiren Death Case) याच्या मृत्यूप्रकरणी संशयित आरोपी सचिन वाझे (Sachin Waze) याची मुंबई पोलिस (Mumbai Police) दलातून हाकलपट्टी करण्याची प्रक्रिया आता सुरू झाली आहे. दरम्यान यापूर्वीच त्याचे निलंबन करण्यात आले आहे. त्याला 13 मार्च दिवशी एनआयए ने ताब्यात घेतले असून मुंबई दोन्ही प्रकरणांचा तपास सुरू आहे. काही दिवसांपूर्वी या प्रकरणामध्ये मुंबई पोलिस विशेष शाखेने महाराष्ट्रात एटीएस (ATS) ला पत्र लिहून या प्रकरणी संबंधित कागदपत्र देण्यास सांगितले आहे. नक्की वाचा: Sachin Vaze यांचा अनिल देशमुखांवर गंभीर आरोप- 'पुन्हा नोकरीवर घेण्यासाठी मागितले 2 कोटी'.
न्यूज रिपोर्ट्स नुसार, एका पोलिस अधिकार्याने दिलेल्या माहितीनुसार, मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणामध्ये मनसुखच्या पत्नीचा देखील जबाब समाविष्ट आहे त्यामुळे या मृत्यूप्रकरणात हिरेनच्या मृत्यूमध्ये वाझेच्या भूमिकेबद्दल संशय निर्माण झाला आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार, कागदपत्र मिळाल्यानंतर विशेष शाखेकडून नुकतीच संविधान मधील कलम 311 अंतर्गत सचिन वाझेची मुंबई पोलिस दलातून हाकलपट्टी करण्यासाठी सुरूवात झाली आहे. आता एटीएस आणि एनआयए यांच्याकडून मिळालेल्या कागदपत्रानुसार, विशेष शाखा वाझेला सेवेतून हाकलण्यासाठी एक प्रस्ताव महाराष्ट्र सरकार कडे देणार आहे त्यानंतर पुढील निर्णय घेतला जाणार आहे.
दरम्यान सध्या एनआयए कडून सचिन वाझेचे साथीदार सहायक पुलिस निरीक्षक रियाजुद्दीन काजी आणि विनायक शिंदे, नरेश गोर यांना देखील अटक केली आहे.काझीला सोमवारी निलंबित करण्यात आले आहे.
दक्षिण मुंबई मध्ये मुकेश अंबानी यांच्या घराजवळ 25 फेब्रुवारीला कारमध्ये स्फोटकं मिळाली आहेत. तर 5 मार्च ला कारचा मालक मनसुख हिरेन याचा मृतदेह ठाण्यात एका खाडीमध्ये आढळला आहे.