मुंबई शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांमध्ये केवळ 10% पाणीसाठा शिल्लक

मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांमध्ये केवळ 10% पाणीसाठी शिल्लक राहिल्याने मुंबईकरांनी पाण्याचा जपून वापर करावा असे आवाहन पालिकेकडून करण्यात आले आहे.

Representative Image (Photo Credit: Facebook)

मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांमध्ये केवळ 10% पाणीसाठी शिल्लक राहिल्याने मुंबईकरांनी पाण्याचा जपून वापर करावा असे आवाहन पालिकेकडून करण्यात आले आहे. सतत वाढणारे तापमान आणि खालावणारी पाण्याची पातळी यामुळे मुंबईकर त्रासले आहेत. त्यातत पाऊस लांबवणीवर पडल्याने शिल्लक असलेला पाणीसाठा पुरवण्याच्या दृष्टीने पालिकेने नियोजन सुरु केले आहे.

महाराष्ट्र टाईम्सने दिलेल्या वृत्तानुसार, मोडकसागर, तानसा, अप्पर वैतरणा, मध्य वैतरणा, तुळशी, विहार व भातसा अशा सात धरणांमधून मुंबईला दररोज 3800 दशलक्ष लिटर पाणीपुरवठा होतो. मात्र आता 10% पाणीकपात असल्याने दैनंदिन पुरवठा 3500 दक्षलक्ष लिटर इतका होतो. (सावधान! सुनिश्चित वेळेत पाऊस पडला नाही तर मुंबईकरांवर येऊ शकते पाणीकपातीचे भयाण संकट)

सात धरणात एकूण 14 लाख 47 हजार दशलक्ष लिटर पाणी असल्यास ते वर्षभर त्याचा पुरवठा होतो. मात्र मागील वर्षी झालेल्या कमी पावसामुळे यंदा दोन लाख दशलक्ष लिटर पाणीसाठा कमी आहे. भातसा, वैतरणा धरणात असलेल्या पाणीसाठ्यात जुलैअखेरपर्यंत पाणीपुरवठा करणे पालिकेला शक्य होईल. त्यामुळे पाऊस लवकरात लवकर आला तर पाणीटंचाईची समस्या सुटेल.