IPL Auction 2025 Live

Mumbai: वेबसाईटच्या माध्यमातून चालवण्यात येणाऱ्या Sex Racket चा पोलिसांकडून पर्दाफाश; 4 मुलींची सुटका

या सेक्स रॅकेट मधून 4 मुलींची सुटका करण्यात आली आहे.

Sex Racket | Representational Image | (Photo Credit: PTI)

वेबसाईटच्या माध्यमातून सेक्स रॅकेट चालवणाऱ्या एका टोळीला मुंबई पोलिसांच्या गुन्हे विभागाने (Mumbai Police Crime Branch) बुधवारी (21 ऑक्टोबर) अटक केली. या सेक्स रॅकेट (Sex Racket) मधून 4 मुलींची सुटका करण्यात आली आहे. लॉकडाऊनपूर्वी देशातील विविध भागातून या मुलींना आणण्यात आले असून हे काम करण्यास त्यांच्यावर जबसदस्ती केली जात होती, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. या प्रकरणात सहभागी असणाऱ्या इतरांचा पोलिस तपास करत आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एस्कॉर्ट सर्व्हिससाठी एका वेबसाईटवर मोबाईल नंबर देण्यात आल्याची माहिती गुन्हा शाखा (युनिट VIII) ला मंगळवारी (20 ऑक्टोबर) मिळाली होती. त्यानंतर पोलिसांना याचा तपास करण्यासाठी सापळा रचला. गुन्हे शाखेतील एका अधिकाऱ्याने ग्राहक म्हणून त्या मोबाईल क्रमांकावर कॉल केला. तेव्हा रणजीत नामक व्यक्ती तो फोन उचलला आणि तीन महिलांचे फोटो पाठवून त्यापैकी एकीची निवड करा असे सांगितले.

कांदिवली येथील हॉटेल बाहेर 5000 रुपये देण्याचे फोनवर ठरवले. त्यानंतर ठरल्यानुसार, रणजीत मुलीला घेऊन हॉटेलबाहेर पोहचला आणि सेक्स रॅकेटचा पर्दाफाश झाला. रणजीत व्यतिरिक्त या प्रकरणात बसंत मंडळ (32), शंभू यादव (39) आणि आशिषकुमार रजक (24) हे तीन जण सहभागी होते. या चौघांनाही अटक करण्यात आली आहे. हे चारही आरोपी झारखंडचे असून सध्या दहिसर येथे राहतात. (उत्तर प्रदेश: सेक्स रॅकेटचा पर्दाफाश करायला आलेल्या पोलिसांना बघून तरुणींनी गच्चीवरून मारली उडी; जागीच मृत्यू)

सेक्स रॅकेटमध्ये अडकलेल्या महिलांना उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल येथील असून काम देतो असे आश्वासन देत संजय नामक व्यक्तीने मुंबईत आणले होते. या महिलांना लॉकडाऊनपूर्वी मुंबईत आणून बळजबरी सेक्स रॅकेटमध्ये अडकवण्यात आले होते. महिलांना मिळालेल्या मोबदल्यातील 60% रक्कम आरोपी घेत असतं, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. दरम्यान, संजयचा शोध अद्याप सुरु आहे. यापूर्वीही देह व्यापारासाठी या साईटचा अनेकदा गैरवापर झाल्याचे आमच्या निदर्शनास आले असल्याने आम्ही वेबसाईटचीही चौकशी करत आहोत, असेही पोलिसांनी सांगितले.