मरिन ड्राईव्ह येथे बुडालेल्या दोघांपैकी एकाचा मृत्यू, दुसऱ्याचा शोध सुरु

तसेच मुसळधार पडणाऱ्या पावसामुळे समुद्राला भरती आली असल्याने ते दोघेजण त्यामध्ये वाहून गेल्याची धक्कादायक घटना घडली.

मरिन लाईन्स (फोटो सौजन्य-ANI)

मुंबईच्या (Mumbai) मरिन ड्राईव्हच्या (Marin Drive) येथे आज (7 जुलै) एकजण बुडाल्याने त्याला वाचवण्यासाठी दुसऱ्या व्यक्तीनेसुद्धा समुद्रात उडी घेतली. तसेच मुसळधार पडणाऱ्या पावसामुळे समुद्राला भरती आली असल्याने ते दोघेजण त्यामध्ये वाहून गेल्याची धक्कादायक घटना घडली.

दोन जण समुद्रात बुडाले असल्याने त्यांचे शोधकार्य सुरु करण्यात आले. यामधील एका व्यक्तीला बाहेर काढण्यात आल्यानंतर उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु त्या व्यक्तीला डॉक्टरांनी मृत घोषित केले. (मुंबई मरिन ड्राइव्ह येथे दोनजण बुडाल्याने खळबळ; पोलिसांसह नौसेनेचे जवान घटनास्थळी दाखल)

मात्र अद्याप दुसऱ्या व्यक्तीचा शोध घेतला जात आहे. या प्रकारामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. परंतु दुसऱ्या व्यक्तीला शोधण्याचे कार्य वेगाने सुरु आहे.