मुंबई वायव्य लोकसभा मतदारसंघ 2019 निवडणूक निकाल: शिवसेनेचे गजानन किर्तीकर आणि काँग्रेसचे संजय निरुपम यांच्यामध्ये रंगणार लढत, कोणाला मिळाणार खासदार पद? जाणून घ्या

लोकसभा निवडणूक 2019 (Lok Sabha Elections 2019) साठी झालेल्या मतदानाची मतमोजणी सुरु झाली असून, निकालही हाती येण्यास सुरुवात झाली आहे. महाराष्ट्रातील एकूण 48 लोकसभा मतदारसंघांपैकी एक असलेल्या मुंबई वायव्यलोकसभा मतदारसंघ आणि या मतदारसंघातील उमेदवारांचे मताधिक्यही हाती येत आहे.

मुंबई वायव्य लोकसभा मतदारसंघ 2019 निवडणूक निकाल: शिवसेनेचे गजानन किर्तीकर आणि काँग्रेसचे संजय निरुपम यांच्यामध्ये रंगणार लढत, कोणाला मिळाणार खासदार पद? जाणून घ्या
प्रतिकात्मक फोटो (फोटो सौजन्य-PTI)

Mumbai North West Lok Sabha Constituency Election Results 2019: लोकसभा निवडणूक 2019 (Lok Sabha Elections 2019) साठी झालेल्या मतदानाची मतमोजणी सुरु झाली असून, निकालही हाती येण्यास सुरुवात झाली आहे. महाराष्ट्रातील एकूण 48 लोकसभा मतदारसंघांपैकी एक असलेल्या मुंबई वायव्य लोकसभा मतदारसंघ आणि या मतदारसंघातील उमेदवारांचे मताधिक्यही हाती येत आहे. या मतदारसंघातून काँग्रेस (Congress) उमेदवार संजय निरुपम (Sanjay Nirupam), शिवसेना-भाजप (Sivsena-BJP) युतीचे उमेदवार गजानन किर्तीकर (Gajanan Kirtikar) आणि बहुजन वंचित आघाडी (BVH) उमेदवार मोहन राठोड (Mohan Rathod) यांच्यात लोकसभा निवडणुकीसाठी जोरदार संघर्ष पाहायला मिळणार आहे. दरम्यान दरम्यान, एक्झिट पोल्सनी भाजप-शिवसेना युतीला अनुकूल तर, काँग्रेस, आघाडीसाठी प्रतिकुल अंदाज दर्शवले आहेत. याच पार्श्वभुमीवर हाती येत असलेली निकालाची आकडेवारी उत्सुकता वाढवणारी ठरणार आहे.  जाणून घ्या महाराष्ट्रासह संपूर्ण भारताचा निकाल एका क्लिकवर, पाहा लाइव अपडेट्स

मुंबईतील वायव्य मतदारसंघासाठी 29 एप्रिल रोजी मतदान पार पडले होते. या मतदारसंघातून उभे असलेले उमेदवार संजय निरुपम, गजानन किर्तीकर यांच्यामध्ये लढत रंगली होती. दरम्यान या दिवशी महाराष्ट्रात 57 टक्के मतदान झाल्याची नोंद करण्यात आली होती. तत्पूर्वी पाच वर्षांपूर्वी गजानन किर्तीकर यांना वायव्य मुंबईच्या मतदारांनी निवडून दिले होते. तसेच संजय निरुपम यांनी सुद्धा यंदाचा लोकसभा निवडणुकीच्या मतदानासाठी मतदारांना काँग्रेस पक्षाला मत द्या असे आवाहन करताना दिसून आले होते.(Exit Poll Results 2019 India: 'एक्झिट पोल'चे अंदाज एनडीएच्या बाजूने; देशात पुन्हा मोदी सरकार)

चौथ्या टप्प्यातील मतदानासाठी महाराष्ट्रातील 17 मतदारासंघामध्ये मतदान घेण्यात आले. तर काँग्रेस आणि शिवसेनेच्या उमेदवारांनी यंदा जोरदार प्रचारसभेतून मतदारांना आपवल्याकडे वळवण्याचा प्रयत्न केला. मात्र आज येणाऱ्या निकालावरुन कोणाच्या बाजूने जनमताचा कौल लागतो हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

(The above story first appeared on LatestLY on May 23, 2019 08:35 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).