Mumbai News: धक्कादायक, अंधेरीतील पबमध्ये महिलाचा मित्रांसोबत दारू पिवून धिंगाणा, पब कर्मचाऱ्यांसोबत पोलीसांना केली मारहाण; घटना सीसीटीव्हीत कैद

अंधेरीतील उच्चभ्रू परिसरातील पब मध्ये महिलेने काल रात्री मित्रांसोबत धिंगाणा घातला आहे. पोलीसांना देखील मारहाण केल्याची घटना समोर आली आहे.

Mumbai News: धक्कादायक, अंधेरीतील पबमध्ये महिलाचा मित्रांसोबत दारू पिवून धिंगाणा, पब कर्मचाऱ्यांसोबत पोलीसांना केली मारहाण; घटना सीसीटीव्हीत कैद
Arrested | (File Image)

Mumbai News: मुंबईतील अंधेरी परिसरातील 'लॉर्ड ऑफ द ड्रिंक्स' (Lord Of Drinks) या पब मध्ये धक्कादायक प्रकार घडला आहे. दारूच्या नशेत महिला आणि तीच्या दोन मित्रांसोबत पबमध्ये धिंगाणा घालत होती. धिंगाणा घालंत पब मधील कर्माचारी आणि त्यानंतर पोलीस कर्मचाऱ्यांवर मारहाण केली. या घटनेचा व्हिडिओ सीसीटीव्ही (CCTV) कॅमेरात कैद झाला आहे. काल मध्यरात्री 2 च्या सुमारास ही घटना घडली. पब मध्ये धिंगाणा सुरु करताच पब कर्मचाऱ्यांनी आंबोली पोलीस ठाण्यात फोन केला.

सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, अंधेरीतील लॉर्ड ऑफ द ड्रिंक्स या नामांकित पबमध्ये काल मध्यरात्री दारूच्या नशेत महिलेने दोन मित्रांसोबत धिंगाणा घातला.  पब कर्मचाऱ्याला रात्रीच्या दोनच्या सुमारास मारहाण केली. या घटनेची माहिती पोलीसांना देण्यात आली.आंबोली पोलीस ठाण्यातील पोलीस निरिक्षक आणि दोन महिला पोलीस कॉंन्टेबल आणि पोलीस कॉंन्टेबल गाडी घेवून घटनास्थळी दाखल झाले. महिलेने पब कर्मचाऱ्याला मारहाण का केली याचे कारण अद्यापही स्षट झाले नाही.

पोलीस निरिक्षण मुकुंद यादव यांच्यावर महिलेने हल्ला केला. मारहाण केल्याची माहिती समोर येत आहे. महिलेने दारूच्या नशेत मुकंद यादव याच्या हातावर चावा घेतला.यात त्यांना दुखापत झाली.पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, महिलेने एकुण सात जणांना जखमी केले आहे. ही घटना संपुर्ण सीसीटीव्ही फुटेज मध्ये कैद झाली आहे. पोलीसांनी ही सर्व फुटेज ताब्यात घेतले. आंबोली पोलीस ठाण्यात अंतर्गत महिले सोबत दोघांना अटक करण्यात आले आहे. महिलेच्या दोन गाड्या देखील पोलीसांनी जप्त केले आहे.

(The above story first appeared on LatestLY on Sep 01, 2023 09:20 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).