Mumbai News: अंधेरीत ट्रकच्या धडकेत 25 वर्षीय तरुणाचा चिरडून मृत्यू, गाडी चालकावर गुन्हा दाखल

अंधेरी पूर्व येथे कंटेनर ट्रकने मोटारसायकलला धडक दिल्याने एका २५ वर्षीय तरुणाला जीव गमवावा लागला.

Accident (PC - File Photo)

Mumbai News: अंधेरी (Andheri) पूर्व येथे एक भीषण अपघात घडला आहे. अंधेरी पूर्व येथे कंटेनर ट्रकने मोटारसायकलला धडक दिल्याने एका 25 वर्षीय तरुणाला जीव गमवावा लागला. नीरज गुप्ता असं तरुणाचे नाव होते. तो एअरटेलमध्ये तंत्रज्ञ होते. मालाड पूर्व येथील रहिवासी असून तो रविवारी रात्रीच्या शिफ्टवर होता. ट्रकचालकाविरुद्ध आरे उपपोलीस ठाण्यात निष्काळजीपणे वाहन चालवल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनास्थळावरून आरोपी ट्रक चालक पळून गेला. पामेरी नगरजवळील जेव्हीएलआर रोडवर अपघात झाला.

मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी पहाटे अडीच वाजता त्याचा भाऊ धीरज याला जेव्हीएलआर रोडवर झालेल्या अपघाताबाबत पोलिसांनी फोन केला. धीरज घटनास्थळी पोहोचला तेव्हा त्याला कंटेनर ट्रकच्या खाली नीरज निपचित पडलेला दिसला. धीरजसह पोलीस आणि अग्निशमन दलाच्या जवानांनी नीरजला बाहेर काढण्यात यश मिळविले. त्याच्या डोक्याला आणि मांडीला दुखापत झाली असून त्याच्या कानातून रक्त येत होते. 

पोलिसांनी त्याला तातडीने जोगेश्वरी येथील ट्रॉमा केअर हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले, तेथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित करण्यात आले. पोलिसांनी आरोपी ट्रक चालकावर गुन्हा दाखल केला निष्काळजीपणे वाहन चालवल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे