Mumbai News: मुंबईत पावसाळी आजारांमध्ये वाढ, मलेरिया, लेप्टो आणि डेंग्यूच्या रुग्णात वाढ
या पार्श्वभूमीवर पालिकेने आपली संपूर्ण आरोग्य यंत्रणा तैनात ठेवली आहे
मुंबईत (Mumbai News) पावसासह आजारही चांगलेच बळावले आहेत. यामध्ये आठवडाभरात डेंग्यूच्या (Dengue) रुग्णांची संख्या दुप्पट तर मलेरिया रुग्णांची संख्या दीड पटीने वाढली आहे. मुंबई शहर आणि उपनगरामध्ये आठवडाभरात मलेरियाचे 721 , डेंग्यूचे 569 आणि गॅस्ट्रोचे 1 हजार 649 रुग्ण आढळले आहेत. या पार्श्वभूमीवर पालिकेने आपली संपूर्ण आरोग्य यंत्रणा तैनात ठेवली असली तरी मुंबईकरांनी काळजी घ्यावी, असे आवाहन पालिकेच्या आरोग्य विभागाकडून करण्यात आले आहे. साथीच्या आजारांना थोपवण्यासाठी उपनगरीय रुग्णालयात 500 बेड्स तैनात ठेवण्यात आले आहेत. तसेच संध्याकाळी 4 ते 6 ओपीडी सुरू ठेवण्यात आले आहेत. (हेही वाचा - Nitin Desai Suicide: आर्थिक विवंचनेतून नितीन देसाई यांची आत्महत्या? स्थानिक आमदार MLA Mahesh Baldi यांनी पहा दिलेली प्रतिक्रिया (Watch Video))
मुंबईत मलेरीया, लेप्टो आणि डेंग्यूच्या रुग्णांमध्ये जुलै महिन्यात वाढ झाली आहे. जुलै महिन्यात गॅस्ट्रोच्या एकूण 1649 रुग्णांची नोंद झाली तर मलेरियाचे देखील जुलै महिन्यात 721 रुग्णांची नोंद झाली होती. जून महिन्यात देखील मलेरीयाचा प्रादुर्भाव होता. गेल्या महिन्यात 676 रुग्णांची नोंद झाली होती.
मुंबईत मलेरीया, लेप्टो आणि डेंग्यूच्या रुग्णांमध्ये जुलै महिन्यात वाढ झाली आहे. जुलै महिन्यात गॅस्ट्रोच्या एकूण 1649 रुग्णांची नोंद झाली तर मलेरियाचे देखील जुलै महिन्यात 721 रुग्णांची नोंद झाली होती. जून महिन्यात देखील मलेरीयाचा प्रादुर्भाव होता. गेल्या महिन्यात 676 रुग्णांची नोंद झाली होती. जुलै महिन्यात 579 डेंग्यू रुग्णांची नोंद झाली आहे. तेच डेंग्यूचे जून महिन्यात 353 रुग्ण आढळून आले होते.म्हणजे जून महिन्याच्या तुलनेत जुलै महिन्यात रुग्ण वाढल्याचे पाहायला मिळाले. चिकनगुनियाच्या रुग्णसंख्येत देखील जूनच्या तुलनेत वाढ होताना पाहायला मिळाली आहे. जून महिन्यात चिकगुनियाचे 8 रुग्ण होते तेच जुलै महिन्यात ही संख्या 24 वर पोहोचल्याचं दिसलं.