Mumbai News: मुंबईतून जप्त केले 37 लाख किंमतीचे विदेशी दारू, आरोपीला अटक; MSED करून कारवाई
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबईत राज्य उत्पन्न शुल्क विभागातकडून मोठी कारवाई करण्यात आली आहे.
Mumbai News: लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबईत राज्य उत्पन्न शुल्क विभागातकडून मोठी कारवाई करण्यात आली आहे. मुंबईच्या वरळी आणि अंधेरी पश्चिम लोखंडवला अशा दोन वेगवेगळ्या ठिकाणी राज्य उत्पादन शुल्क विभागाने केलेल्या कारवाईत तब्बल 37 लाख 28 हजार 560 रुपये किमतीचे विदेशी मद्य जप्त केले आहे. दरम्यान दिल्लीत मद्य घोटाळा प्रकरणात मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची ईडी कारवाई करत आहे. (हेही वाचा- डोंबिवलीत चारित्र्याच्या संशयावरून पत्नीवर जीवघेणा हल्ला, आरोपी फरार
मिळालेल्या माहितीनुसार, विदेशी मद्य प्रकरणात सतीश शिवलाल पटेल (३५ वर्षे) याला राज्य उत्पादन शुल्क विभागाने अटक केली आहे.राज्य विभागाने (सतीश) आरोपीवर महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम 1949 चे कलम 65 (अ) (ई),81, 90, 98, 103 अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पोलिसांनी वरळी आणि अंधेरी पश्चिम लोंखडवाला येथे छापा टाकला होता.
छापा दरम्यान पोलिसांनी अवैद्य मद्य असल्याचे समजले त्यावेळी आरोपीला दारूसहीत पोलिसांनी ताब्यात घेतले. पोलिसांच्या चौकशीत दिल्लीत त्यांने मद्य पाठवल्याचे कबुल केले. फक्त मुंबईतील वरळी आणि अंधेरी येथून 37 लाख 28 हजार 560 रुपयांची मद्य पोलिसांनी जप्त केली आहे. पोलिस यावर पुढील तपासणी करत आहे. दिल्लीतील मद्य पोलिस मुंबईत घेऊन येणार आहे अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.