Mumbai News: दादर येथे कारची बाईकला जोरात धडक, अपघातात पोलिस हवालदार जखमी, चालकावर गुन्हा दाखल
एका पोलीस हवालदाराचा अपघात झाल्याची माहिती समोर येत आहे. हवालदार कामावरून घरी जात असताना एका कारने धडक दिल्याने अपघात (Accident) झाला.
Mumbai News: मुंबईतील (Mumbai) दादर (Dadar) येथे एका पोलीस हवालदाराचा अपघात झाल्याची माहिती समोर येत आहे. हवालदार कामावरून घरी जात असताना एका कारने धडक दिल्याने अपघात (Accident) झाला. या अपघातात ते जखमी झाल्याची माहिती मिळाली आहे. पोलिस हवालदार हे मोटारसायकलवरून घरी जात असताना हा कारने समोरून धडक दिला या अपघातात ते जखमी झाले. या अपघातानंतर दादर पोलिसांनी अज्ञात कारचालकाविरुध्द एफआयआर नोंदवून तपास सुरु केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, कीर्ती कॉलेज जंक्शन येथे मोटारसायकलवरून घरी जात असलेले कॉन्स्टेबल विवेक विजय कदम यांना अज्ञात कारने जोरात धडक दिली. या अपघातात ते जखमी झाले. स्थानिकांनी त्यांना जखमी अवस्थेत केईएम रुग्णालयात दाखल करण्यात आले.डॉक्टरांनी तपसाल्यावर त्याचा पाय फ्रॅक्चर झाल्याचे आढळून आले. (हेही वाचा- नाशिकमध्ये कर्तव्यदक्ष पोलिस कर्मचाऱ्याने मोटरसायकलवर डब्बा ठेऊन केलं जेवण,
एका पोलीस अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, कदम हे लोकल आर्म्स 1 मध्ये तैनात आहेत. रविवारी पहाटे 4.30 वाजण्याच्या सुमारास ते कीर्ती कॉलेजकडून मोटारसायकलवरून जात असताना सिद्धिविनायक मंदिराजवळून आलेल्या कारने कॉन्स्टेबलच्या मोटारसायकलला धडक दिली, त्यात ते जखमी झाले. धडक लागल्यानंतर कार चालक अपघातस्थळावरून फरार झाला. दादर पोलिसांनी या अपघाताची नोंद घेतली असून कारचालका विरुध्द गुन्हा दाखल करून घेतला आहे. दादर पोलिस या चालकाला शोधत आहे. परिसरातील सीसीटीव्ही कॅमेरे तपासत आहे.
(The above story first appeared on LatestLY on Dec 05, 2023 08:57 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

