Mumbai News: मुंबईत 99 वर्षीय महिलेवर यशस्वी शस्त्रक्रिया, जसलोक रुग्णालयात पार पडली शस्त्रक्रिया
मुंबईत एका 99 वर्षीय वृध्द महिलेवर यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली आहे.
Mumbai News: मुंबईतील जसलोक हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटरमध्ये 99 वर्षीय महिलेला नवजीवन मिळाल्याची घटना समोर आली आहे. एकेकाळी गावात पडलेल्या आणि गंभीर पाठदुखीमुळे अंथरुणात खिळून पडलेल्या एका 99 वर्षीय वृध्द महिलेला पुन्हा नवजीवन मिळाले आहे. महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील असलदे गावातील असलेल्या मायावती तांबे या रुग्णाला इतर समस्यांचाही सामना करावा लागला. जसलोक रुग्णालयातील एंडोस्कोपिक स्पाइन सर्जन डॉ मनीष कोठारी यांनी शस्त्रक्रिया केली. मायावती तांबे आता स्वंतत्रपणे चालू शकत आहे.
जसलोक हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटरमध्ये त्यांना मिळालेल्या शस्त्रक्रियेच्या यशामुळे मायावती स्वतंत्रपणे चालू शकत आहे. तांबे यांना जसलोक रूग्णालयात उपचारासाठी आणण्यात आले, तेथे डॉक्टरांना तिचे वजन केवळ 26 किलो असल्याचे आढळून आले. त्यामुळे पाठीवर शस्त्रक्रिया करणे हे फार जोखीमीचे काम होते असं डॉक्टरांनी सांगितले. मणक्याचे दुखणे आणि बसू न शकल्यामुळे श्वासोच्छवासाच्या हालचाली खराब झाल्यामुळे 99 वर्षीय रुग्णाला बॅक्टेरियल न्यूमोनिया (या वयात संभाव्यतः घातक) झाला. त्यामुळे तिला उच्च उपचारासाठी आयसीयूमध्ये हलवण्यात आले.
आयसीयूत मध्ये मायावती ही सर्वात वृध्द महिला जे अनेक आजारांना लढा देत आहे.असं डॉक्टरांनी सांगितले. दरम्यान त्यांच्या वर बायोप्सी करण्यात आली. त्यांनी बऱ्याच आजारांचा सामाना करत नवजीवन प्राप्त केले आहे. मायावती यांनी डॉक्टरांचे आभार मानले, म्हणाल्या ती तिच्या मुलांवर अवलंबून होती आणि आता उपचारानंतर पुन्हा आपल्या पायावर उभी राहू शकते.