Sucide In Borivali lockup: लॉकअप मध्ये तरुणाने गळफास घेतला, बोरीवलीतील घटनेमुळे परिसरात खळबळ
बोरीवली परिसरात खळबळ
Sucide In Borivali lockup: बोरिवली (Borivali) पोलिस स्टेशनच्या जनरल लॉकअपमध्ये (Lockup) एका २८ वर्षीय तरुणाने आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. दीपक जाधव यांनी शुक्रवारीच्या सकाळी 8.10 च्या सुमारास गळफास लावून घेतला, पोलिसांनी सांगितले की, त्यांना शताब्दी हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले जेथे त्यांना सकाळी 8.45 वाजता डॉक्टरांनी मृत घोषित केले. अधिक माहिती देताना पोलिसांनी सांगितले की, मृत व्यक्ती हा बोरिवली पश्चिम येथील रामचंद्र भंडारी चाळ येथे राहत होता. आरोपीने तुरुंगात आत्महत्या का केली असे अनेक प्रश्न उपस्थित झाले आहे.
भारतीय दंड संहिता कलम 326 (अॅसिड वापरून दुखापत करणे), 379 (चोरी), 323 (दुखापत करणे), 504 (शांतता भंग करणे) आणि 506 (गुन्हेगारी धमकावणे) या कलमांखाली गुन्हा दाखल केल्यानंतर पुणे पोलिसांकडून त्याची कोठडी घेण्यात आली. त्याला 26 जुलै रोजी हत्येप्रकरणी अटक केली होती. न्यायालयाने त्याला 28 जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली होती, त्यामुळे त्याला सामान्य लॉकअपमध्ये ठेवण्यात आले होते. एका मजबूत रस्सीच्या साहित्याने त्याने गळफास लावून घेतला, असेही पोलिसांनी सांगितले.
पोलिस या आत्महत्ये प्रकरणात तपास करत आहे. तरुणाने आत्महत्या करण्या मागचे कारण अद्यापही पोलिसांच्या हाती लागले नाही. आरोपीने कारागृहात आत्महत्या केल्याने अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत.गुन्हे शाखेच्या पथकासह उत्तर विभागातील वरिष्ठ पोलीस अधिकारी घटनास्थळी उपस्थित होते. आरोपी तरुणाने आत्महत्या केल्यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे.