Mumbai Accident: परळमध्ये भरधाव बाईकने टॅक्सीला धडक दिल्याने भीषण अपघात, 24 वर्षाच्या तरुणाचा मृत्यू, 1 जण जखमी

टॅक्सीला दुचाकीची धडक लागल्याने एका बाईक चालवणाऱ्या तरुणाचा जागीच मृत्यू झाला तर दुसरा तरुण पुलावरून खाली पडल्याची माहिती समोर आली आहे.

Accident (PC - File Photo)

Mumbai Accident: टॅक्सीला दुचाकीची धडक लागल्याने एका बाईक चालवणाऱ्या तरुणाचा जागीच मृत्यू झाला तर दुसरा तरुण पुलावरून खाली पडल्याची माहिती समोर आली आहे. लोअर परळ येथील दाताजी नलावडे पुलावरील फिनिक्स टॉवरसमोर हा अपघात झाला. पुलावरून पडल्याने जखमी झाला त्याला  ही घटना गुरुवारी पहाटे 3च्या सुमारास घडली.  अपघात झाला तेव्हा दोघांचा बाईक रेसिंग शर्यत चालू होती असा संशय पोलिसांना आला.

मिळालेल्या माहितीनुसार, टॅक्सी चालक सुबोध सिंग (37) हा मुंबई सेंट्रलहून येत होता आणि दुचाकीस्वार उस्मान खान (24) हा दादरहून महालक्ष्मीला जात होता. सिंह यांच्या म्हणण्यानुसार, खान यांची बाईक त्यांच्या टॅक्सीला धडकण्यापूर्वी प्रथम रेलिंगला धडकली. जोरात धडक लागल्याने टॅक्सी पूर्णपणे खराब झाली आहे आणि  उस्मान खान यांना केईएम रुग्णालयात नेण्यासाठी त्यांनी महिला प्रवाशांसह दुसरी टॅक्सी थांबवली. त्याला आणखी दोन तरुणाची मदत घेतल्याचे त्याने सांगितले. मात्र रुग्णालयात पोहचल्यावर  उस्मान खान यांना डॉक्टरांनी मृत घोषित केले.

पुलावरून खाली पडलेल्या अल्पेश जाधव (25) या दुचाकीस्वाराला नायर रुग्णालयात नेले, जिथे त्याच्यावर उपचार सुरू आहेत. पोलिसांना संशय आहे की, ही तरुण बाईकच्या शर्यतीत होते त्यापैकी काही जण घटनास्थळावरून फरार झाले. बाईक वेगात असल्याने तो अनियंत्रित झाल्याने अपघात झाला.