Mumbai News: मुंबई विमानतळावरून झिम्बाब्वेच्या विद्यार्थिनीला अटक; तपासणी दरम्यान बॅगेत सापडली बंदुकीची गोळी

सहारा पोलीस ठाण्यात या घटनेची नोंद करण्यात आली आहे.

arrest

Mumbai News: मुंबई (Mumbai) येथील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर एका 20 वर्षीय झिम्बाब्वेच्या विद्यार्थीच्या बॅगेत बंदुकीची गोळी सापडल्यामुळे तिला अटक (Arrest) करण्यात आली आहे. असे एका अधिकाऱ्याने मंगळवारी वृत्तांना माहिती दिली. तीनं भारतातील महाविद्यालयात नुकताच प्रवेश घेतला आहे. मारुम्बवा वय वर्ष 20 असं अटक झालेल्या महिलेचे नाव आहे.  तिच्या बॅगेत तपासणी दरम्यान गोळी सापडली होती. या गोष्टीची माहिती पोलीसांत देण्यात आली. पोलीसांनी हा  संदर्भात चौकशी सुरु केली आहे.

सहार पोलिस ठाण्यात या घटनेची नोंद घेण्यात आली आहे. महिलेने महाविद्यालयात बीएससी मेडिकल लॅब सायन्स च्या प्रथम वर्षाचे शिक्षण घेण्यासाठी लुधियाना येथील जायचे होते. मुबंईतून ती दिल्लीला जाण्यासाठी विमानतळावर आली तेव्हा तीची संपुर्ण चेकिंक करण्यात आली. आणि एका पिवळ्या बॅगेत बंदुकीची गोळी सापडली. या घटनेमुळे विमानतळावर मोठी खळबळ उडाली आहे.

सहार पोलिस ठाण्याच्या अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, महिला रविवारी सकाळी मुंबईत आली. सुरक्षा कर्मचाऱ्यांना तिच्या बॅगेत गोळी सापडल्याचे सहार पोलीस ठाण्यात तक्रार केली. पोलीसांनी घटनास्थळावरून तीला अटक करत पोलीस ठाण्यात घेवून आले. या घटने अंतर्गत पोलीस पुढील तपास करत आहे.