Mumbai Shocker: जुहू परिसरात अज्ञातांकडून 2 तरुणांवर लोखंडी साखळीने प्राणघातक हल्ला; अज्ञातांविरुध्दात गुन्हा दाखल

जूहु परिसरात अज्ञात व्यक्तींकडून दोन तरुणांवर प्राणघात हल्ला केल्याची माहिती जूहू पोलिसांनी दिली आहे.

Attack | Representational image (Photo Credits: pxhere)

Mumbai Shocker:  मुंबईतील जुहू (Juhu) परिसरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे  अज्ञातांकडून 2 जणांवर लोखंडी साखळीने प्राणघातक हल्ला केल्याची माहिती जुहू पोलिसांनी दिली. जुहू पोलीसांनी (Police) या अज्ञात आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मारहाणी संदर्भात पोलीसांनी गुन्हा दाखल केला आहे. रात्रीच्या वेळीस आरोपींनी पीडीत व्यक्तीवर हल्ला केला आहे. आरोपींने हल्ला का केला यांच कारण अद्यापही स्पष्ट झाले नाही. हल्ल्यात पीडीत व्यक्तीला गंभीर जखमा झाल्या आहेत.  स्थानिकांच्या मदतीने त्याला तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार,  31 जुलैच्या मध्यरात्री आकाश साळुंके (26) आणि त्याचा मित्र ऋषिकेश शेट्टी, जो अंधेरी पश्चिमेचा रहिवासी आहे, एका ऑटोरिक्षाने पहाटे 1 वाजता अंधेरीहून जुहूकडे जेवणासाठी निघाले होते. पहाटे दीड वाजता ते जुहू सर्कलवर पोहोचले आणि पैसे काढण्यासाठी कोटक बँकेच्या एटीएममध्ये त्यांची गाडी थांबवली.थांबत असताना तीन-चार जण त्यांच्याजवळ आले आणि त्यांनी एवढ्या रात्री कुठे फिरत होते, याची विचारणा केली. ऋषिकेश शेट्टी ऑटोतून पळून जाण्यात यशस्वी झाला  या हल्ल्यातून ऋषिकेशने स्वता: चे प्राण वाचवले. परंतु त्याचा मित्र आकाश साळुंके पळून जाऊ शकला नाही. हल्लेखोरांनी आकाशला लोखंडी साखळीने मारहाण केल्याने तो गंभीर जखमी झाला. पीडितेला  स्थानिकांच्या मदतीने कोकिलाबेन रुग्णालयातील आयसीयू वॉर्डमध्ये दाखल करण्यात आले.

हल्ल्यामागील नेमके कारण अद्याप समोर आलेले नाही. भारतीय दंड संहिता (IPC) च्या कलम 323 (दुखापत करणे), 324 (धोकादायक शस्त्रांनी हल्ला करणे), 34 (गुन्ह्यासाठी सामान्य हेतू) आणि 504 (शांतता भंग करणे) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस या संदर्भात तपासणी करत आहे अशी माहिती जूहू पोलीसांनी दिली आहे.