Mumbai news: वीज पडून 16 वर्षीय मुलाचा मृत्यू, जुहू चौपाटीवरील दुर्घटना

या घटने अंतर्गत सांताक्रुझ पोलीसांनी अपघाती मृत्यूची नोंद घेतली.

Death | Representative Photo (Photo Credit: PTI)

Mumbai news: जुहू (Juhu)  बीच अंधेरी पश्चिम येथे एका 16 वर्षीय मुलाचा बुडून मृत्यू झाल्याची माहिती BMC च्या MFB लेव्हल-L0 ने गुरुवारी दिली. हसन युसूफ शेख असे या मुलाचे नाव आहे. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. मुंबई अग्निशमन दलाने (MFB) दिलेल्या माहितीनुसार, गणपती विसर्जन कर्तव्यादरम्यान, दृष्टी लाइफगार्ड्सने शेखची जुहू बीचवर समुद्राच्या खवळलेल्या पाण्यातून सुटका केली. त्यानंतर त्यांना 108 क्रमांकाच्या रुग्णवाहिकेतून कूपर रुग्णालयात नेण्यात आले.

मात्र, कूपर रुग्णालयाच्या डॉक्टरांनी हसन युसूफ शेख यांना येताच मृत घोषित केले. मिळालेल्या माहितीनुसार, हसन हा सांताक्रुझ येथील वाकोला परिसरात रहिवाशी होता. गणपती विसर्जनाच्या मिरवणुकी पाहण्यासाठी एकटात जुहूवर आला होता. त्यावेळी ही दुर्घटना घडली. अशी माहिती उपस्थित अधिकाऱ्यांनी दिली. समुद्रकिनारी पाण्याजवळ उभा असताना त्याला विजेचा धक्का बसला आणि तो पाण्यात पडला.

ही घटना दुपारी साडेचारच्या सुमारास घडल्याचे पोलिसांनी सांगितले. या घटनेमुळे मुलाच्या कुटूंबावर दुखाचा डोंगर कोसळला आहे. सांताक्रुझ पोलीस ठाण्यात अपघाती मृत्यूची नोंद घेण्यात आली आहे. सांताक्रुझ पोलीसांनी त्यांच्या पालकांचा शोध घेत घटनेची माहिती दिली. मुलाचा मृतदेह पोलीसांनी पालकांना स्वाधीन केला.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif