उद्याचे हवामान महाराष्ट्र: कोकण, मराठवाडा, विदर्भ सह महाराष्ट्रात 9 ऑगस्टची पावसाची स्थिती काय?
हवामान खात्याने पुढील पाच दिवसांसाठी महाराष्ट्रातील विविध भागांसाठी हवामान इशारे जारी केले असून, उत्तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यांत विजांच्या कडकडाटासह वादळ आणि ताशी ३०-४० किमी वेगाने वारे वाहण्याची शक्यता वर्तवली आहे.
Maharashtra Weather Prediction For August 9: रविवार, ९ ऑगस्ट रोजी महाराष्ट्रात बहुतांश भागांत हवामान तुलनेने स्थिर राहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. हवामान खात्याच्या इशारा नकाशानुसार शनिवारच्या तुलनेत राज्यात यलो अलर्ट दिलेला भाग कमी आहे. मात्र कोकण किनारपट्टी आणि घाटमाथ्यावर पावसाचा जोर कायम राहणार आहे. सध्या एकूणच महाराष्ट्र राज्यामध्ये पावसाने थोडी विश्रांती घेतल्याचं चित्र आहे. अधूनमधून पाऊस कोसळत असल्याचं चित्र आहे. IMD च्या अंंदाजानुसार, उत्तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ, हलका ते मध्यम पाऊस आणि ताशी ३०-४० किमी वेगाने वाहणारे सोसाट्याचे वारे येण्याची दाट शक्यता आहे.
कोकण विभाग
मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या कोकणातील जिल्ह्यांत ९ ते १३ ऑगस्ट या कालावधीत व्यापक स्वरूपाचा पाऊस होण्याचा अंदाज आहे. मुंबई आणि उपनगरांत ढगाळ वातावरणासह हलक्या ते मध्यम सरी बरसण्याची शक्यता आहे. या भागातील कोणत्याही जिल्ह्यासाठी विशेष इशारा देण्यात आलेला नाही, मात्र सखल भागांत पाणी साचण्याची शक्यता नाकारता येत नाही.
मध्य महाराष्ट्र
पुणे, नाशिक, कोल्हापूर, सोलापूर, अहमदनगर, जळगाव आणि धुळे या जिल्ह्यांत ९ ऑगस्टपासून तुरळक ते विखुरलेल्या स्वरूपाचा पाऊस सुरू होण्याचा अंदाज आहे. पुणे, सातारा आणि कोल्हापूर घाटमाथ्यावर पिवळा इशारा कायम असून, या भागांत जोरदार सरींची शक्यता आहे. नाशिक घाटमाथ्यावरही मध्यम पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
मराठवाडा
छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर आणि धाराशिव या जिल्ह्यांत हलक्या पावसाची तसेच काही ठिकाणी मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट होण्याची शक्यता आहे. या भागासाठी सध्या कोणताही विशेष इशारा जारी करण्यात आलेला नाही, मात्र हवामान खात्याने नागरिकांना सतर्क राहण्याचा सल्ला दिला आहे.
विदर्भ
अकोला, अमरावती, बुलढाणा, वाशीम, नागपूर, वर्धा, यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा आणि गोंदिया या विदर्भातील जिल्ह्यांत ९ ऑगस्ट रोजी हवामान तुलनेने कोरडे व स्थिर राहण्याची शक्यता आहे. या भागासाठी सध्या कोणताही विशेष इशारा नाही.
शेतकऱ्यांसाठी सूचना
घाटमाथ्यावरील जिल्ह्यांतील नागरिक आणि पर्यटकांनी पावसाच्या काळात प्रवास टाळावा, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. शेतकऱ्यांना पिकांची व जनावरांची योग्य काळजी घेण्याचा सल्ला देण्यात आला असून, अद्ययावत हवामान इशाऱ्यांसाठी हवामान खात्याच्या अधिकृत संकेतस्थळाला नियमित भेट देण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
(The above story first appeared on LatestLY on Aug 08, 2026 04:50 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

