दारु पिऊन गाडी चालवल्यास चालकांचे नाव पोलिसांच्या संकेतस्थळावर झळकणार

मात्र आता दारुड्या चालकांवर चाप बसण्यासाठी पोलिसांनी आता नवा उपाय शोधून काढला आहे

प्रतिकात्मक फोटो (फोटो सौजन्य-फेसबुक)

दारु पिऊन गाडी चालवल्यानंतर पोलिसांनी पकडल्यास काही वेळेस दंड भरावा लागतो किंवा चालकाविरुद्ध कारवाई केली जाते. मात्र आता दारुड्या चालकांवर चाप बसण्यासाठी पोलिसांनी आता नवा उपाय शोधून काढला आहे. तर नुकताच जानेवारी ते एप्रिल महिन्यादरम्यान 63 दारुड्या चालकांची नावे पोलिसांनी त्यांच्या संकेतस्थळावर पोस्ट केली आहेत.

वाहतूक पोलिसांकडून नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी वाहनचालकांना वाहतूकीचे नियम पाळण्याची सक्त ताकीद दिलेली असते. तरीही काही वेळेस वाहन चालक भरधाव वेगाने गाडी चालवाताना दिसून येतात. यामुळे एखादा अपघात घडण्याची शक्यता फार जास्त असते. त्याचप्रमाणे दारु पिऊन गाडी चालवणे हे वाहतूकीच्या नियामांविरुद्ध असून पोलीस या प्रकरणी कडक कारवाई करत सरळ कोर्टात खटला दाखल करतात. तर आता चक्क पोलिसांकडून 63 जणांना दारु पिऊन गाडी चालवाताना पकडले आहे.

(दारु पिऊन गाडी चालविली, पादचारी तरुणाचा मृत्यू)

तर दारु पिऊन गाडी चालवलेल्या सर्व वाहन चालकांवर कारवाई करण्यात आली असून त्यांच्या विरोधात दंडात्मक कारवाई केली आहे. तसेच कारवाई केलेल्या वाहन चालकांचे नाव, पत्त्यासह त्यांची यादी संकेस्थळावर टाकण्यात आली आहे.