Mumbai-Nagpur e-way वर एकमार्गी प्रवासासाठी 1100 रुपये टोल

या महामार्गावरुन वाहतुक करणाऱ्या कमी वजनांच्या वाहनांसाठी एकतर्फी प्रवासाचा टोल 1100 रुपये असणार आहे.

Highways Image used for representational purpose | (Photo Credits: File Photo)

मुंबई (Mumbai) आणि नागपूरला (Nagpur) जोडणारा समृद्धी महामार्गाचे काम सुरु करण्यात आले असून या प्रकल्पाची एकूण किंमत 55,000 कोटी इतकी आहे. टाईम्स ऑफ इंडियाच्या रिपोर्टनुसार, या महामार्गावरुन वाहतुक करणाऱ्या कमी वजनांच्या वाहनांसाठी एकतर्फी प्रवासाचा टोल 1100 रुपये असणार आहे, अशी माहिती एमएसआरडीसी चे जॉईंट मॅनेजिंग डिरेक्टर अनिल कुमार गायकवाड यांनी शुक्रवारी दिली. तसंच नागपूर ते शिर्डी मधल्या महामार्गाचे काम डिसेंबर 2021 पर्यंत आणि ठाण्यापर्यंतच्या महामार्गाचे काम डिसेंबर 2022 पर्यंत पूर्ण करणार असल्याची माहिती एकनाथ शिंदे यांनी दिली.

या 701 किमी च्या प्रोजेक्टच्या पॅकेज 1 चे परीक्षण एकनाथ शिंदे, अनिल कुमार गायकवाड, निशिकांत सुखे, आमदार आशिष जयस्वाल, शिवसेना नेते किरण पांडव इतर काही नेत्यांकडून करण्यात आली. केंद्र सरकारने 2008 मध्ये दिलेल्या गाईडलाईन्सनुसार, टोल स्वीकारला जाईल. कमी वजनांच्या वाहनांसाठी 1.65 रुपये प्रति किमी इतका टोल आकरण्यात येईल. अवजड वाहनांसाठी हा टोल तीनपट असेल. नागपूर-शिर्डी मधील प्रोजेक्टचे बांधकाम 79 टक्के तर संपूर्ण प्रोजेक्टचे बांधकाम 70 टक्के झाले आहे.

कोविड-19 संकटामुळे 40 टक्के कामगार काम सोडून गेले होते. त्यामुळे या कामाला थोडा विलंब लागला. परंतु, आता सर्व सुरळीत केले असून 35000 कामगार आणि 5500 मशिन्स या प्रोजेक्ट्ससाठी कार्यरत आहेत, अशी माहिती गायकवाड यांनी दिली. नागपूर ते शिर्डी दरम्यानच्या रस्त्याचे बांधकाम 1 मे रोजी पूर्ण करावे, असा आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गेल्या वर्षीच्या डिसेंबर मध्ये सांगितले होते. (मुंबई नागपूर अंतर फक्त 8 तासांत; देशातील सर्वात मोठा महामार्ग, 'हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गाचे काम जोरात सुरु)

20 पैकी 15 नोएड्स चे काम सुरु झाले असून हा प्रकल्प राज्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे आहे. हा एक्स्प्रेस वे जेएनपीटी ला देखील जोडला जाणार आहे. या एक्सप्रेस वे मुळे विदर्भ आणि मराठवाड्यात  वेगवेगळ्या इंडस्ट्रीज आकर्षित होतील आणि तेखील परिसराचा विकास होईल. या एक्स्प्रेस हायवे वर तुम्ही 150 किमी प्रति तास वेगाने गाडी चालवू शकता. यामुळे मुंबई ते नागपूरला जाण्यासाठी लागणारा 15 तासांचा कालावधी कमी होऊन 6-7 तासांवर येईल.