Mumbai: महालक्ष्मी रेसकोर्सजवळ उभा राहणार Mumbai Eye, फॅशन स्ट्रीटचा होणार मेकओव्हर; मुंबईत पर्यटन व रोजगाराला चालना देण्यासाठी सरकारचे महत्वाचे निर्णय
आठवड्याचे पहिले तीन दिवस ते मुंबईत हजर राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.
मुंबईमध्ये (Mumbai) 'लंडन आय'च्या धर्तीवर 'मुंबई आय' (Mumbai Eye) नावाची रचना उभारण्यात येत आहे. माहितीनुसार ही रचना, महालक्ष्मी रेसकोर्सजवळ त्याच्या मूळ प्रस्तावित ठिकाणी तयार होणार आहे. पर्यटनाला चालना देणारा हा प्रकल्प वांद्रे पश्चिम येथील कार्टर रोडवर हलवण्यात आला होता. मात्र, स्थानिक रहिवाशांकडून याला प्रचंड विरोध झाला. ही रचना पाहण्यासाठी गर्दी झाल्यास मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी निर्माण होईल अशी शक्यता तिथल्या रहिवाशांनी वर्तवली. त्यामुळे मुंबई आय आता बांद्रावरून पुन्हा महालक्ष्मीकडे परतली आहे.
बुधवारी मुंबई शहराचे पालकमंत्री दीपक केसरकर यांनी बीएमसी अधिकाऱ्यांची बैठक घेतली. त्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना ते म्हणाले, 'मुंबई सुशोभिकरणाचा कार्यक्रम जपण्याची गरज आहे. सरकारला रेसकोर्सचा काही भाग विकसित करायचा आहे जिथे सर्वसामान्य नागरिक वेळ घालवू शकतील. ते कुठेही हलवले जाणार नाही. आम्हाला रेसकोर्सजवळ मुंबई आय विकसित करायचे आहे जिथे पुरेशी जागा उपलब्ध आहे. ते पर्यटकांसाठीही योग्य आहे.'
शहराबाबतच्या आणखी एका महत्त्वाच्या घोषणेत केसरकर म्हणाले की, फॅशन स्ट्रीटला मेकओव्हर दिला जाईल. त्यांनी सांगितले, ‘सध्या फॅशन स्ट्रीट हे फूटपाथवर स्टॉल अतिक्रमण असल्यासारखे दिसते. त्यासाठी योग्य सीमांकन आणि नमुना आवश्यक आहे. त्यामुळे फॅशन स्ट्रीटचे नुतनीकरण केले जाईल. यासह कोळीवाड्यांचा पर्यटन स्थळ म्हणून विकास करण्यात येणार आहे. त्यामुळे समुद्रकिनाऱ्यावरील सूर्यास्ताच्या दृश्याचा आनंद घेताना पर्यटकांना स्वादिष्ट कोळी पदार्थ चाखता येतील. शिवाय, यामुळे स्थानिकांना रोजगार मिळेल.’ (हेही वाचा: Shiv Sena Dasara Melava 2023: शिवाजी पार्क वर दसरा मेळाव्यासाठी BMC कडून ठाकरे गटाला परवानगी मंजूर)
नागरी संस्था प्रायोगिक तत्त्वावर कफ परेड, वरळी आणि माहीम कोळीवाडा येथे फूड कोर्ट सारखी सुविधा चालवणार आहे. कोळीवाडे स्वच्छ व दुर्गंधीमुक्त ठेवण्यासाठी सुक्या मासळीसाठी सोलर ड्रायर देण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले. गेल्या आठवड्यात, केसरकर यांनी जाहीर केले की ते जनतेच्या तक्रारी ऐकण्यासाठी बीएमसी मुख्यालयाला भेट देणार आहेत. आठवड्याचे पहिले तीन दिवस ते मुंबईत हजर राहणार असल्याचे त्यांनी सांगितले. त्यांनी यापूर्वीच 'शहराच्या भल्यासाठी' 42 कलमी कार्यक्रम नागरी प्रशासनाला दिला आहे. दर बुधवारी, मंत्री अजेंडावरील नागरी अधिकाऱ्यांकडून आढावा घेतील.