मुंबई महाराष्ट्र राज्यातील सर्वात प्रदुषित शहर; 'ग्रीनपीस इंडिया'चा अहवाल

तर देशाची आर्थिक राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबईत सुद्धा त्याचे परिणाम दिसून येत आहेत. सध्या मुंबईतील हवेचा दर्जा खालावला जात असल्याने प्रदुषणात अधिक वाढ होत आहे

File image of air pollution (Photo Credits: PTI)

देशभरात प्रदुषणाचा स्तर दिवसेंदिवस वाढत चालला आहे. तर देशाची आर्थिक राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबईत सुद्धा त्याचे परिणाम दिसून येत आहेत. सध्या मुंबईतील हवेचा दर्जा खालावला जात असल्याने प्रदुषणात अधिक वाढ होत आहे. ग्रीनपीस इंडिया (Greenpeace India) या पर्यावरण संस्थेकडून सादर करण्यात अहवालातून असे समोर आले आहे की, देशातील प्रदुषित शहरे कोणती आहेत याची यादी समोर आली आहे. त्यानुसार मुंबईचे सुद्धा नाव असून त्याचे स्थान 2018 मध्ये 37 व्या क्रमांकावर होते. तर आता मुंबईचे नाव असून राज्यातील सर्वाधिक प्रदूषित शहर असल्याते समोर आले आहे.

ग्रीनपीस इंडियाच्या माहितीनुसार, महाराष्ट्र राज्यात डोंबिवली, चंद्रपूर, उल्हासनगर, ठाणे, पुणे, अमरावती, नागपूर, जालना, लातूर, कोल्हापूर, पिंपरी, चिंचवड, नाशिक, सांगली, जळगाव, अकोला, सोलापूर, नवी मुंबई, औरंगाबाद आणि भिवंडी मध्ये हवेची गुणवत्ता राष्ट्रीय हवा गुणवत्ता मानकापेक्षा व जागतिक आरोग्य संघटनेच्या मापदंडापेक्षा 8 पट अधिक आहे. मुंबईतील हवेची गुणवत्ता एवढी खराब झाली आहे की, वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्स येथे लावण्यात आलेले कृत्रिम फुफ्फुसे काळवंडली आहेत. स्थानिक प्रशासनाने हे कृत्रिम फुफ्फुसे लावत प्रदुषणामुळे होणाऱ्या नुकसानी बाबत जागृत करण्यासाठी हा उपक्रम राबवला आहे. मंगळवारी वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्स येथील एअर क्वॉलिटी इंडेक्स 340 च्या पार गेला होता. हवेची गुणवत्ता 300 पेक्षा अधिक होणे हे अधिक धोक्याचे मानले जाते. यापूर्वी गेल्या वर्षात डिसेंबर महिन्यात हवेची गुणवत्ता सातव्या वेळेस 200 च्या पार गेल्याचे दिसून आले होते.(Mumbai Weather Update: मुंबई शहरामध्ये 26 जानेवारीपासून थंडी परतणार; हवामान खात्याचा अंदाज)

राज्यातील वाढती लोकसंख्या, उद्योगधंदे आणि नागरिकांच्या सोईसुविधांसाठी उभारण्यात येणारे प्रकल्प, इमारत बांधणी यासारख्या विविध कारणामुळे प्रदुषण वाढ होण्यास अधिक मदत होत आहे. मुंबईतील आजचे तापमान 27 अंश सेल्सिअस असून दिल्लीत तापमानाचा पारा 12 अंशावर पोहचला आहे.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif