Mumbai Monsoon 2019: मुंबईत सखल भागातील पाणी ओसरले; सुरक्षेच्या कारणास्तव कुर्ला, परळ आणि अंधेरी येथे NDRF पथक सज्ज

या पार्श्वभूमीवर मुंबईतील कुर्ला (Kurla), परळ (Parel) आणि अंधेरी (Andheri) या पाणी साचण्याच्या संभाव्य ठिकाणी NDRF पथक सज्ज ठेवण्यात आले आहेत.

NDRF Team & Mumbai Floods (Photo Credits: ANI)

मुंबईसह उपनगरात मागील तीन दिवसांपासून पावसाचा हाहाकार दिसून आला, एकीकडे आज पावसाचा जोर कमी झाल्याने सखल भागातील पाणी ओसरत असले तरी हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार येत्या दोन दिवसात मुसळधार पाऊस होऊ शकतो. या पार्श्वभूमीवर मुंबईतील कुर्ला (Kurla), परळ (Parel) आणि अंधेरी (Andheri) या पाणी साचण्याच्या संभाव्य ठिकाणी NDRF पथक सज्ज ठेवण्यात आले आहेत. तसेच सुरक्षेच्या कारणास्तव आज मुंबई, कोकण (Konkan)  व ठाणे (Thane) येथील शाळा, ज्युनिअर कॉलेजला सुट्टी देण्यात आली आहे. दरम्यान, मुंबईची लाईफलाईन म्हणून ओळखली जाणारी रेल्वेसेवा आता हळूहळू पूर्वपदावर येत आहे, मात्र अजूनही मध्य, हार्बर आणि पश्चिम मार्गावर लोकल उशिराने धावत आहेत. (Maharashtra Monsoon Forecast 2019)

ANI ट्विट

Skymet या हवामान अंदाज लावणाऱ्या खाजगी विभागानुसार, यंदा मुंबईतील सप्टेंबर महिन्याची सरासरी अवघ्या तीन दिवसात पडलेल्या पावसाने भरून काढली आहे. ठाणे जिल्ह्यात काल 173 मिमी इतका पाऊस झाला. तर एकट्या सांताक्रूझ मध्ये पावसाने सरासरीचा तीन अंकी आकडा गाठला होता. या पावसानंतर मुंबईत मिठी नदीने धोक्याची पातळी ओलांडली होती, यामुळे अगोदरच नागरिकांना सावधानतेचा इशारा देण्यात आला होता, कालांतराने पावसाचं जोर वाढू लागल्याने एनडीआरएफ पथकाकडून कुर्ला येथील क्रांती नगर परिसरातील 1300 नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आले होते.

दरम्यान मुंबईत गणेशोत्सवाची धामधूम सुरु असताना पावसाने थैमान घातला होता, परिणामी अनेक ठिकाणी बाप्पाच्या मंडपात देखील पाणी शिरले होते. कामाच्या निमित्ताने बाहेर पडलेली माणसे कुठे पावसात रखडलेल्या लोकल मध्ये तर रस्त्यावर ट्राफिक मध्ये अडकली होती. या सर्वाना पाठिंबा म्ह्णून यावेळी अनेक गणेश मंडळांनी पुढाकार घेतला होता.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif