मुंबई: एमआयएम आमदार वारिस पठाण यांची मुंबई पोलिसांसोबत शाब्दीक चकमक; नागपाडा परिसरात काही काळ तणाव

मात्र, त्यांच्यासोबत असलेल्या इतर काही लोकांना ताब्यात घेतल्याचे पोलिसांनी म्हटले आहे. यावर वारिस पठाण यांनी मात्र पोलीसांनी आपल्याला ताब्यात घेतलं होतं, असा दावा केला आहे.

MIM MLA Waris Pathan | (Photo Credits: Facebook)

एमआयएम आमदार वारिस पठाण (MIM MLA Waris Pathan) आणि मुंबई पोलीस (Mumbai Police) यांच्यात शुक्रवारी (16 ऑगस्ट 20149) शाब्दिक चकमक उडाली. ही घटना नागपाडा (Nagpada) येथे घडली. पूर्वपरवानगी न घेता विशेष प्रार्थनेाठी एकत्र येण्यावरुन ही चकमक उडाली. दरम्यान, वारिस पठाण यांनी पोलीसांनी आपल्याला ताब्यात घेतल्याचा आरोप केलाआहे. तर, पोलिसांनी मात्र पठाण यांचा दावा फेटाळून लावत आपण त्यांना घटनास्थळावरुन निघून जाण्यास सांगितल्याचे म्हटले आहे.

कोणतीही पूर्व परवानगी न घेता आमदार वारिस पठाण हे विशेष प्रार्थनेसाठी नागपाडा येथे उपस्थित राहिले होते. या वेळी इतर लोकही मोठ्या संख्येने उपस्थित होते. जम्मू काश्मीर राज्यातील 370 कलम हटवल्यामुळे कथीत धोका टाळण्यासाठी पोलीस यंत्रणा सतर्क आहे. मोठा समुदाय एका ठिकाणी कोणतीही पूर्वपरवानगी न घेता जमल्याने पोलीस घटनास्थळी पोहोचले. तसेच, कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी आमदार पठाण यांना घटनास्थळावरुन निघून जाण्यास पोलीसांनी सांगितल्याचे, न्यूज 18 लोकमतने आपल्या वृत्तात म्हटले आहे. (हेही वाचा, चेहऱ्यावरील भाव पाहून गुन्हेगाराचा खरेपणा ओळखणारी सिस्टम; मुंबई पोलीस चाचणी घेण्याची शक्यता)

दरम्यान, वारिस पठाण यांना ताब्यात घेण्यात आले नाही. मात्र, त्यांच्यासोबत असलेल्या इतर काही लोकांना ताब्यात घेतल्याचे पोलिसांनी म्हटले आहे. यावर वारिस पठाण यांनी मात्र पोलीसांनी आपल्याला ताब्यात घेतलं होतं, असा दावा केला आहे.