Mumbai Building Collapse Updates: डोंगरी इमारत दुर्घटना प्रकरणात आमचा संबंध नाही, कोसळलेला भाग अनधिकृत: म्हाडा

अद्यापही घटनास्थळी मदत आणि बचाव कार्य सुरु आहे. या इमारतीच्या कोसळलेल्या ढिगाऱ्याखाली सुमारे 40 जण अडकल्याची भीती सकाळपासून व्यक्त केली जात आहे.

Mumbai Building Collapse At Dongri | (Photo Credits: ANI)

Mumbai Building Collapse Updates: मुंबईतील डोंगरी (Dongri) परिसरात असलेल्या केसरभाई इमारत दुर्घटना प्रकरणात जबाबदारी कोणाची? या प्रश्नावर म्हाडाने स्पष्टीकरण दिले आहे. ही इमारत आणि त्या इमारतीचा कोसळलेला भाग याच्याशी आमचा म्हाडाचा काहीही संबंध नाही. कोसळलेली इमारत ही पूर्णपणे अनधिकृत होती. हा भाग म्हाडाच्या कार्यक्षेत्रात येत नाही, असेही म्हाडाने म्हटले आहे. म्हाडाचे प्रमुख जनसंपर्क अधिकारी वैशाली गडपाले (Mumbai Mhada PRO Vaishali Gadpale) यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे ही माहिती दिली आहे. दरम्यान, ही इमारत म्हाडाचे असल्याचे मुंबई महापालिकेने म्हटले आहे. त्यामुळे या इमारतीवरुन म्हाडा (Mhada) आणि मुंबई (Mumbai) महापालिकेत तूतूमैंमैं सुरु आहे.

वैशाली गडपाले यांच्या प्रसिद्धी पत्रकातील प्रमुख मुद्दे

(हेही वाचा, Mumbai Building Collapse Updates: डोंगरी मधील दुर्घटनेप्रकरणी कसून चौकशी होणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा आदेश)

एएनआय ट्विट

दरम्यान, आतापर्यंत हाती आलेल्या माहितीनुसार, डोंगरीतील केसरभाई इमारतीचा काही भाग कोसळून घडलेल्या दुर्घटनेत पाच जण ठार तर आठ जण गंभीर जखमी झाले आहेत. अद्यापही घटनास्थळी मदत आणि बचाव कार्य सुरु आहे. या इमारतीच्या कोसळलेल्या ढिगाऱ्याखाली सुमारे 40 जण अडकल्याची भीती सकाळपासून व्यक्त केली जात आहे.