Mumbai MHADA Lottery Result 2024: मुंबई म्हाडाच्या 2030 घरांसाठी सोडत निकाल कार्यक्रमास सुरूवात; housing.mhada.gov.in वर पहा अपडेट्स
तसेच संध्याकाळी 6 नंतर म्हाडाच्या अधिकृत वेबसाईट वर प्रतिक्षा यादी, विजेत्यांची यादी जाहीर केली जाणार आहे. तेथेही निकाल नंतर पाहता येणार आहे.
How To Check MHADA Lottery Result: म्हाडाच्या मुंबई मधील घरांसाठी आज सोडत (MHADA MUMBAI BOARD LOTTERY DRAW 2024) जाहीर होण्यास सुरूवात झाली आहे. आज 2030 घरांसाठी ही सोडत जाहीर होत आहे. यामध्ये मुंबईत विक्रोळी, गोरेगाव, दादर, ताडदेव सह विविध भागातील घरांसाठी लाखो लोकं आपलं नशीब आजमावणार आहेत.म्हाडाच्या घरासाठी आज लॉटरी पद्धतीने निकाल जाहीर केला जाणार आहे. तो नागरिकांना प्रत्यक्ष नरिमन पॉईंट येथील यशवंतराव चव्हाण सेंटर मध्ये तर ऑनलाईन माध्यमातूनही @MHADAOFFICIAL या युट्युब चॅनेल वर निकाल पाहता येणार आहे. सकाळी 11 वाजल्यापासून निकाल जाहीर करण्यास सुरूवात झाली आहे. www.mhada.gov.in वर उमेदवारांना या निकालानंतर पुढील प्रक्रियेचे देखील अपडेट्स मिळणार आहेत.
2,030 युनिट्समध्ये मध्यम उत्पन्न गट (MIG) श्रेणीमध्ये सर्वाधिक घरे म्हणजेच जवळजवळ 768 अपार्टमेंट्स असतील. लॉटरीसाठी उपलब्ध असलेल्या घरांमध्ये दुसऱ्या क्रमांकाची सर्वात जास्त घरे ही कमी उत्पन्न गटासाठी (LIG) असून त्यांची संख्या 627 अपार्टमेंट इतकी आहेत.आर्थिक दुर्बल विभाग (EWS) श्रेणीमध्ये 359 युनिट्स आणि उच्च उत्पन्न गटासाठी (HIG) अपार्टमेंटची किमान संख्या 276 आहेत.
इथे पहा मुंबई म्हाडाच्या घरांसाठी सोडतीचा निकाल
आता निकाल जाहीर झाल्यानंतर भाग्यवान विजेत्यांना त्यांचा निकाल एसएमएस च्या मध्यमातून देखील कळवला जातो. तसेच संध्याकाळी 6 नंतर म्हाडाच्या अधिकृत वेबसाईट वर प्रतिक्षा यादी, विजेत्यांची यादी जाहीर केली जाणार आहे. तेथेही निकाल नंतर पाहता येणार आहे. आज निकालानंतर अनामत रक्कम 9 ऑक्टोबरपासून परत देण्यास सुरुवात केली जाईल.