मुंबई मेट्रोसाठी 508 झाडांची कत्तल करण्याचा प्रस्ताव, शिवसेना पक्षाच्या भुमिकेकडे नागरिकांचे लक्ष

यामधील 162 झाडे ही मुळापासून कापली जाणार असून काही झाडांची पुर्नरोपण करण्यात येणार असल्याचे ही प्रस्तावात म्हटले आहे.

Metro (Photo Credits: Twitter)

आरे मेट्रोसाठी झाडांची कत्तल करण्यात येण्याचा प्रकारवरुन मोठा गदारोळ झाला होता. तसेच नागरिकांनी आणि पर्यावरण प्रेमींनी याचा जोरदार विरोधत करत आंदोलन केले होते. त्यावेळी पोलिसांनी काही आंदोलनकर्त्यांना सुद्धा ताब्यात घेतले होते. मुंबई मेट्रोच्या फेज 3 साठी आरे कॉलनी येथे कारशेड उभारण्याचा प्रस्ताव आहे. मात्र त्यासाठी या परिसरातील हजारो झाडे तोडण्यात येणार आहेत. याबाबत सरकारने आपला विचार बदलावा म्हणून पर्यावरणप्रेमींनी कोर्टात धाव घेतली होती. कोर्टात आतापर्यंत एकूण चार याचिका दाखल करण्यात आल्या होत्या, ज्या आता न्यायालयाने फेटाळून लावल्या होत्या. त्यानंतर आता मुंबई मेट्रोसाठीपुन्हा 508 झाडांची कत्तल करण्याचा प्रस्ताव ठेवण्यात आला आहे. यामधील 162 झाडे ही मुळापासून कापली जाणार असून काही झाडांची पुर्नरोपण करण्यात येणार असल्याचे ही प्रस्तावात म्हटले आहे. मात्र आता सत्तेत असलेल्या शिवसेना काय भुमिका घेणार याकडे लक्ष लागले आहे.

मेट्रोसाठी झाडे कापण्याचा प्रस्ताव महापालिकेच्या वक्षप्राधिकरण समितीकडे मंजुरीसाठी पाठवण्यात आला आहे. तर या झाडांची कत्तल अंधेरी पश्चिम डी.एन. नगर ते ओशिवरा नाला दरम्यान मेट्रो मार्ग 2-ए दरम्यानची 32 झाडांची कत्तल करण्यात येणार आहेत. मात्र येथे 90 झाडांचे पुर्नारोपण करण्यात येईल. गोरेगाव पश्चिम मेट्रो-2ए प्रकल्पासाठी गोरेगाव आणि बांगूरनगर दरम्यान 29 झाडे कापून त्या ठिकाणी 85 नवी झाडे लावण्यासाठीची परवानगी दिल्ली मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशनकडे मागण्यात आली आहे.(अदित्य ठाकरे यांच्याकडून आरे जंगलाचे समर्थन; म्हणाले, शिवसेनेचा मेट्रोला नाही तर, कारशेडला विरोध)

कांदिवली पश्चिम येथे मेट्रो लाईन 2एक दरम्यान 64 झाडांची कत्तल करुन त्या ठिकाणी 37 नवी झाडे, लिंक रोड ते चारकोप दरम्यान 11 झाडांची कत्तल करुन 86 झाडांचे पुर्नारोपण करण्यात येणार आहेत. याबाबतचा प्रस्ताव वृक्षप्राधिकरणाच्या समितीकडे पाठवण्यात आला आहे.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif