Mumbai Metro Fare Discount: शिंदे सरकारचं आता ' 'मुंबई मेट्रो' प्रवाशांना महाराष्ट्र दिनाचं गिफ्ट! जेष्ठ नागरिक, दिव्यांग, विद्यार्थ्यांच्या तिकीटात सवलत जाहीर

65 वर्षांवरील वरिष्ठ नागरिक, इयत्ता 12 वी पर्यंत शिकणारे विद्यार्थी आणि कायमस्वरूपी दिव्यांग लोकांसाठी शिंदे सरकारने ऑफर जाहीर केली आहे.

Mumbai Metro Card (PC - Twitter/@MMRD)

शिंदे सरकारकडून काही दिवसांपूर्वी एसटी बस प्रवासा दरम्यान महिलांना 50% भाडं माफ केल्यानंतर मुंबई मध्ये मेट्रो (Mumbai Metro) ने प्रवास करण्यासाठी आता जेष्ठ नागरिक, दिव्यांग, विद्यार्थ्यांच्या तिकीटात सवलत जाहीर केली आहे. 1 मे अर्थात महाराष्ट्र दिना पासून ही सवलत मिळेल अशी माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी दिली आहे. आता मुंबई मेट्रोमधून आता ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग तसेच विद्यार्थ्यांना सवलतीच्या दरात प्रवास करता येणार आहे. 1 मे पासून 25% सवलतीच्या दरात 3 श्रेणीमधील प्रवासी प्रवास करू शकणार आहेत. ही सवलत नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड (मुंबई वन) वापरणाऱ्यांना मिळणार आहे.

महामुंबई मेट्रो ऑपरेशन कॉर्पोरेशन लिमिटेड आणि MMRDA कडून महाराष्ट्र दिनाची ही भेट असल्याची माहिती देण्यात आली आहे. प्रशासनाच्या माहितीनुसार, ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थी आणि दिव्यांग प्रवाशांना 45-60 ट्रिपसाठी मुंबई वन पासावर ही सवलत मिळणार आहे. सामाजिक भावनेतून हा सवलतीचा निर्णय घेतला असून मेट्रो प्रवासातील या सवलतीमुळे अधिक संख्येने लोक यातून प्रवास करतील असा विश्वासही मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला आहे. Mumbai Metro ने प्रवास करणार्‍यांसाठी खुशखबर! आता या 5 स्थानकावरच मिळणार पार्किंगची सुविधा .

कशी मिळणार सवलत ?

तिकीटाच्या दरातील सवलती मेट्रो लाइन 2 A आणि 7 च्या मेट्रो स्टेशनवरील कोणत्याही तिकीट खिडकीत आवश्यक कागदपत्र दिल्यावर मिळू शकतील. नवीन आणि पूर्वी खरेदी केलेल्या मुंबई-1 कार्डवर देखील सवलत असेल तसेच याला 30 दिवसांची वैधता असणार आहे. 65 वर्षांवरील वरिष्ठ नागरिक, इयत्ता 12 वी पर्यंत शिकणारे विद्यार्थी आणि कायमस्वरूपी दिव्यांग लोकांसाठी ही सवलत आहे. प्रवाशांना सवलतीसाठी काही कागदपत्रे सादर करावी लागणार आहेत. दिव्यांगांसाठी सरकारी/वैद्यकीय संघटनेचे प्रमाणपत्र, ज्येष्ठ नागरिकांसाठी वयाचा पुरावा आणि विद्यार्थ्यांसाठी पॅन (विद्यार्थी किंवा पालक पॅन) सोबत शाळा ओळखपत्र यासारखी वैध कागदपत्रे आवश्यक आहेत.

मुंबई मेट्रोची लाईन 2A ही यलो लाईन आहे आणि लाईन 7 ही रेड लाईन म्हणून ओळखली जाते. समांतर धावणार्‍या या लाईनवर दहिसर पूर्व आणि डी एन नगर आणि न्यू लिंक रोडवरील वाहतूक कोंडी कमी करण्याच्या उद्देशाने सुरू करण्यात आली आहे. तर मुंबई ब्लू लाईन ही घाटकोपर वर्सोवा दरम्यान धावते.