Mumbai Mega Block On September 22: मुंबईच्या तीनही रेल्वेमार्गांवर मेगाब्लॉक, पाहा संपूर्ण वेळापत्रक
यात मध्य मार्गावर मुलूंड (Mulund) ते माटुंगा (Matunga) दरम्यान अप मार्गावर, हार्बर मार्ग कुर्ला-वाशी अप तसेच डाऊन मार्गावर आणि मुंबई सेंट्रल ते माटुंगा अप आणि डाऊन अशा दोन्ही रेल्वे मार्गावर हा मेगाब्लॉक असणार आहे
येत्या रविवारी म्हणजेच 22 सप्टेंबरला मुंबईच्या तीनही रेल्वेमार्गांवर मेगाब्लॉक (Megablock) ठेवण्यात आला आहे. यात मध्य मार्गावर मुलूंड (Mulund) ते माटुंगा (Matunga) दरम्यान अप मार्गावर, हार्बर मार्ग कुर्ला-वाशी अप तसेच डाऊन मार्गावर आणि मुंबई सेंट्रल ते माटुंगा अप आणि डाऊन अशा दोन्ही रेल्वे मार्गावर हा मेगाब्लॉक असणार आहे. यात अनुक्रमे पहिल्या दोन मार्गाच्या मेगाब्लॉकचा कालावधी हा सकाळी 11.10 ते 3.45 वाजेपर्यंत असणार असून पश्चिम मार्गावर मुंबई सेंट्रल ते माटुंगा या मार्गावरील मेगाब्लॉकची वेळ सकाळी 10.35 पासून दुपारी 2.35 मिनिटांपर्यंत असणार आहे.
रेल्वे दुरुस्तीच्या कामांसाठी दर रविवारी मुंबई रेल्वे मार्गावर मेगाब्लॉक असतोच. तसेच उद्या देखील हा मेगाब्लॉक ठेवण्यात आला आहे. पाहूया कसे असेल वेळापत्रक
M-Indicator चे ट्विट:
1. मध्य रेल्वे
कल्याणवरुन सुटणारी सर्व जलद अप मार्गावारील रेल्वे सेवा ही सकाळी 10.37 ते संध्याकाळी 3.06 मिनिटांपर्यंत दिवा ते परेल दरम्यान धिम्या मार्गावर वळविण्यात आली आहेत. आणि परेल नंतर त्या पुन्हा जलद मार्गावर वळविण्यात आल्या आहेत. या मार्गावरील रेल्वे ही 20 मिनिटे उशिराने धावतील. तर डाऊन मार्गावरील जलद सेवा सकाळी 10.5 मिनिटांपासून ते 3.22 पर्यंत सीएसमटी वरुन सुटणा-या सर्व गाड्या घाटकोपर, विक्रोळी, भांडूप, मुलूंड आणि दिवा स्थानकात थांबविण्यात येतील.
हेही वाचा- Mumbai Mega Block on September 15: मुंबई लोकलच्या मध्य, पश्चिम आणि हार्बर मार्गावर आज मेगाब्लॉक
2. हार्बर रेल्वे
डाऊन हार्बर लाईन सेवा सीएसएमटी ते वाशी/बेलापूर/पनवेल आणि अप मार्गावरील पनवेल/बेलापूर/वाशी सुटणा-या रेल्वे रद्द करण्यात आल्या आहेत. तसेच या मेगाब्लॉक दरम्यान सीएसएमटी ते कुर्ला आणि वाशी ते पनवेल विशेष लोकल चालविण्यात येतील. प्रवाशांची गैरसोय होऊ नये म्हणून हार्बर च्या प्रवाशांना ट्रान्सहार्बर मार्गावरून प्रवास करण्याची मुभा रेल्वेने दिली आहे.
3. पश्चिम रेल्वे
मुंबई सेंट्रल ते माटुंगा अप आणि डाऊन मार्गावर सकाळी 10:35 ते दुपारी 2.35 वाजेपर्यंत मेगाब्लॉक ठेवण्यात आला आहे. तसेच या मेगाब्लॉक दरम्यान सांताक्रूज ते मुंबई सेंट्रल या मार्गावरील रेल्वे सुरु राहतील.
रविवारच्या मेगाब्लॉक मुळे 50104 रत्नागिरी-दादर पॅसेंजर दिवा जंक्शन येथे थांबवली जाईल. तर 50103 दादर-रत्नागिरी पॅसेंजर ही दिवा जंक्शन येथून सोडण्यात येईल.