Covid 19 Vaccination: मुंबईच्या महापौर Kishori Pednekar यांनी घेतला कोविड 19 लसीचा पहिला डोस (Watch Video)

मुंबईत वांद्रे परिसरात असलेल्या बीकेसी जम्बो कोविड लसीकरण केंद्र येथे जाऊन किशोरी पेडणेकरांनी कोरोनाची लस घेतली आहे.

Kishori Pednekar| Photo Credits: Twitter/Kishori Pednekar

मुंबई मध्ये वाढत्या कोरोना रूग्णसंख्येला रोखण्यासाठी अ‍ॅक्शन मोड मध्ये असलेल्या शहराच्या महापौर किशोरी पेडणेकर (Kishori Pednekar) यांनी आज (4 मार्च) कोविड 19 लसीचा पहिला डोस घेतला आहे. मुंबईत वांद्रे परिसरात असलेल्या बीकेसी जम्बो कोविड लसीकरण केंद्र येथे जाऊन किशोरी पेडणेकरांनी कोरोनाची लस घेतली आहे. यावेळी त्यांनी सर्वसामान्यांना देखील लस घेण्याचं आवाहन केले आहे. Covid-19 Vaccination in India: 1 मार्चपासून सुरु होणाऱ्या कोविड-19 लसीकरणाच्या तिसऱ्या टप्प्यात काय आहेत महत्त्वाचे नियम आणि अटी; वाचा सविस्तर.

भारतामध्ये पुन्हा कोरोना रूग्णांची संख्या वाढत असल्याने आता सरकारकडून वयोवृद्ध आणि सहव्याधी असणार्‍या नागरिकांना कोविड 19 ची लस देण्याला सुरूवात केली आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या प्रमाणेच मुंबई मध्येही आता कोविड 19 लसीकरणाला सुरूवात झाली आहे. एनसीपी अध्यक्ष शरद पवार, खासदार सुप्रिया सुळे यांनी देखील कोविड 19 ची लस टोचून घेतली आहे. Mumbai: BMC केंद्रांव्यतिरिक्त आता 29 अतिरिक्त खाजगी रुग्णालयांना लसीकरणाची परवानगी; जाणून घ्या यादी.

किशोरी पेडणेकर

मुंबई मध्ये मागील महिन्याभराच्या काळात कोरोना रूग्णसंख्येमध्ये पुन्हा वाढ होत असल्याचं पहायला मिळालं आहे. मागील काही महिन्यांत कोरोना संसर्ग फैलावाची स्थिती नियंत्रणात असल्याचं चित्र असताना मागील काही दिवसांत 24 तासांमध्ये पुन्हा 1000 पेक्षा अधिक रूग्ण आढळत असल्याने भीतीचं वातावरण निर्माण झाले आहे.

मुंबई मध्ये काल आरोग्यविभागा कडून देण्यात आलेल्या माहितीनुसार कोविड 19 च्या रूग्णांची संख्या मागील 24 तासांत 1121 नव्या रुग्णांची भर पडून 3,28,740 झाली आहे. तर काल 6 जणांचा मृत्यू झाला आहे. दुसरीकडे काल 734 रुग्णांनी कोरोनावर मात देखील केली आहे.

देशभरात कोविड 19 ला रोखण्यासाठी लसीकरण सुरू झाले असले तरीही पुढील काही महिने मास्क बंधनकारक आहे, सोशल डिस्टन्सिंग पाळणं आवश्यक आहे सोबतच वेळोवेळी हात साबणाने नीट धुणं आवश्यक असल्याचं सांगण्यात आले आहे.