Mumbai Marathon 2019: उद्या होणाऱ्या मुंबई मॅरेथॉनसाठी वाहतुकीच्या मार्गात बदल; विशेष लोकल्स, बसेसची सुविधा
20 जानेवारी रोजी होणाऱ्या मुंबई मॅरेथॉनसाठी वाहतुकीच्या मार्गात काही बदल करण्यात आले आहे.
Mumbai Marathon 2019: 20 जानेवारी रोजी मुंबई मॅरेथॉन होणार असून दरवर्षीप्रमाणे यंदाही मॅरेथॉनचा उत्साह सगळीकडे दिसून येत आहे. हजारोंच्या संख्येत स्पर्धेत सहभागी होणाऱ्या लोकांच्या सुरक्षिततेसाठी आणि सोयीसाठी वाहतुकीच्या मार्गात काही बदल करण्यात आले आहे. उद्या पहाटे 4 ते दुपारी 1 या कालावधीत वाहतुकीच्या मार्गात बदल केले आहेत. रेल्वे अपघातातील तरुणी द्रविता सिंग धावणार मुंबई मॅरेथॉनमध्ये
पाहुया कसे असतील हे बदल
# कुलाबा कफ परेड येथून विमानतळाच्या दिशेने जाण्यासाठी पी. डिमेलो मार्गाचा वापर करावा लागेल. या मार्गावरुन कर्नाक पूल-जे. जे. रुग्णालय- सात रस्ता - तुलसी पाईप रोड- माहीम चर्चमार्गे पश्चिम उपनगरात जावू-येऊ शकतील.
# मलबार हिल वरुन विमानतळाकडे जाण्यासाठी नेपियनसी रोड, पेडर रोड पुलाखालून, ऑगस्ट क्रांती मैदान, नाना चौक, जावजी दादाजी मार्ग, मुंबई सेंट्रल पुलावरून सातरस्ता, महालक्ष्मी रेल्वे स्थानक, तुलसी पाइप रोड या मार्गांचा वापर करु शकता.
# पश्चिम रेल्वेच्या महालक्ष्मी स्थानकाबाहेर पश्चिमेकडे तर मध्य रेल्वेच्या परळ स्थानकाबाहेर पश्चिमेकडे बसची व्यवस्था करण्यात आली आहे.
# दूरदर्शन भवन येथून वरळी डेअरीकडे जाण्यासाठी बसची व्यवस्था करण्यात आली आहे.
रेल्वे लोकलमधील बदल
# मध्य मार्ग : मध्यरात्री 3 वा. कल्याण- सीएसएमटी (आधीची वेळ 4.41)
# हार्बर मार्ग : मध्यरात्री 3:10 वा. पनवेल-सीएसएमटी (आधीची वेळ 4.03)
पश्चिम मार्गावर विशेष लोकल
- मध्यरात्री 2.45 विरार ते सीएसएमटी
- मध्यरात्री 3.05 विरार ते सीएसएमटी
हे मार्ग बंद असतील
- बांद्रा-वरळी सिलिंक या दरम्यान वाहतुकीसाठी बंद राहील.
- मरीन ड्राइव्ह (एन. एस. रोड) वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आला आहे.
- बांद्राच्या पुढे पश्चिम आणि पूर्व उपनगरात वाहतुकीच्या मार्गात कोणतेच बदल नसतील.
त्याचबरोबर मुंबई लोकल मेगाब्लॉकचे वेळापत्रकही लक्षात घेणे सोयीचे ठरेल.