Mumbai Police Arrested Stuntman: मुंबई येथील एका इमारतीच्या 23व्या मजल्यावर जीवघेणे स्टंट करणाऱ्या 'त्या' तरूणाला अटक
यातच काही दिवसांपूर्वी मुंबईतील (Mumbai) एका इमारतीच्या 23व्या मजल्यावर स्टंट (Dangerous Stunts) करणाऱ्या तरूणाचा व्हिडीओ व्हायरल झाला होता.
सोशल मीडियावर (Social Media) प्रसिद्धी मिळवण्यासाठी अनेकजण जीवघेणे सेल्फी किंवा व्हिडिओ (Viral Video) बनवताना आपण पाहिले आहेत. यातच काही दिवसांपूर्वी मुंबईतील (Mumbai) एका इमारतीच्या 23व्या मजल्यावर स्टंट (Dangerous Stunts) करणाऱ्या तरूणाचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. मुंबई पोलिसांना (Mumbai Police) यासंदर्भात माहिती मिळताच पोलिसांनी तत्काळ याप्रकरणी तपास करण्यास सुरुवात केली होती. त्यानंतर पोलिसांनी गुरूवारी रात्री या तरूणाला अटक केली आहे. तसेच या तरूणाच्या इतर मित्रांचाही पोलीस शोध घेत आहेत.
मुंबई पोलिसांनी तपास सुरु करताच हा व्हिडीओ कांदिवलीतील एका तरूणाने शूट केल्याचे निष्पन्न झाले. याप्रकरणी कांदवली पोलिसांनी अधिक चौकशी केली. हा व्हिडीओ कांदिवली पश्चिम भागात असणाऱ्या भारत बिल्डिंगमधील 23व्या मजल्यावर शूट करण्यात आला अशी माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर पोलिसांनी या व्हिडिओतील तरूणाला अटक केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, नोमाण डिसूजा असे जीवघेणे स्टंट करणाऱ्या तरूणाचे नाव आहे. नोमाण हा आपल्या मित्रांसोबत अनेकदा अशाप्रकारचे धोकादायक स्टंट केल्याचे समजत आहे. तसेच धोकादायक स्टंट करणे त्याची आवड असल्याचे त्याने पोलिसांना सांगितले आहे. हे देखील वाचा- Siblings Murder In Jalgaon: कुऱ्हाडीचे घाव घालून 4 अल्पवयीन भावंडांची हत्या, रावेर तालुक्यातील बोरखेडा गावातील घटना
व्हिडिओ-
सोशल मीडियावर बऱ्याचदा तत्काळ प्रसिद्धी मिळवण्यासाठी सेल्फी किंवा व्हिडीओ बनवण्याच्या प्रयत्नात दरवर्षी कोट्यवधी लोक मरण पावले आहेत. तसेच इंटरनेटवर अनेक सोशल मीडिया चॅलेंजेसही व्हायरल होत असतात. ज्यामुळे अनेकांना आपला जीव गमवावा लागतो. अनेकदा या प्रसिद्धिसाठीच अनेक जीवघेणे स्टंट करण्याचा प्रयत्न अनेकांच्या जीवावर बेतू शकतो.