Mumbai: प्रेयसीच्या आईने नात्याला नकार दिल्याने तरुणाने पेटवले गर्लफ्रेंडचे घर
मुंबईच्या (Mumbai) उल्हासनगर (Ulhasnagar) भागात ही घटना घडली आहे.
प्रेयसीच्या आईने नात्याला नकार दिल्याने, एका 30 वर्षीय युवकाने आपल्या गर्लफ्रेंडच्या घराला आग लावल्याची घटना घडली आहे. मुंबईच्या (Mumbai) उल्हासनगर (Ulhasnagar) भागात ही घटना घडली आहे. टाईम्स ऑफ इंडियाने याबाबत वृत्त दिले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अशोक वाघमारे, आणि रेखा मारुतीया यांना लग्न करायचे होते.
मात्र अशोक बेरोजगार असल्यामुळे मुलीच्या आईने त्यांच्या नात्याला विरोध केला होता. सोमवारी आरोपीने लग्नासाठी या मुलीचा हात मागितला होता, मात्र हा मुलगा पैसे कमावण्यासाठी काहीच करत नसल्याने मुलीच्या आईने या लग्नाला नकार दिला.
मुलीच्या आईने नकार दिल्यावर या तरुणाने त्यांच्या घराला आग लावण्याची धमकी दिली. त्यानंतर खरोखरच त्याने हे कृत्य केले. त्याने घरातील कपडे जाळण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर मुलीच्या आईने पोलिसात धाव घेतली. त्यानंतर पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले आहे. (हेही वाचा: Citizen Amendment Bill: भाजप आमदाराचे घर जाळले; आंदोलनाने घेतले हिंसक वळण)
याआधी अशीच एक घटना मुंबई येथे घडली होती. एका व्यक्तीने अंधेरी येथील आपल्या एक्स गर्लफ्रेंडच्या घराला आग लावली होती. ही घटना जुलैमध्ये घडली होती. गर्लफ्रेंड आपल्याशी बोलत नाही म्हणून आपण हे केल्याचे त्याने सांगितले होते. या आरोपीवर खुनाचा प्रयत्न, विनयभंग आणि आग लावून त्रास देणे यासाठी गुन्हा दाखल करण्यात आला होता.