मुंबई: विधानसभा निवडणूकीच्या 'ड्राय डे' दिवशी दारूची सोय करण्यासाठी ऑनलाईन खरेदी पडली महागात; तब्बल 38 हजारांचा फटका

याबाबत खार पोलिसांकडे तक्रार आली असून तपास सुरु आहे.

Image For Representation (Photo Credits: PTI, Pixabay)

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या (Maharashtra Assembly Elections 2019)  काळात अनुचित प्रकाराला आळा घालण्यासाठी मतदानाच्या दोन दिवस आधी तसेच नतदान आणि मतमोजणीच्या दिवशी राज्यभरात मद्य विक्रीस बंदी (Dry Day) घालण्यात आली आहे. पण यापासून वाचण्यासाठी मुंबईतील एका महाभागांनी आपली शक्कल लढवण्याची ठरवले आणि ऑनलाईन दारूची ऑर्डर दिली. ही दारू ड्राय डे च्या आधीच मागवून साठवून ठेवण्याचा प्लॅन होता खरा पण ही आयडिया या इसमाच्या आता चांगलीच अंगाशी आली आहे. ओनलाईन पद्धतीने ऑर्डर काहीशी गल्लत झाल्यामुळे या व्यक्तीला चक्क 38 हजार रुपयांचा गंडा बसल्याचे समजत आहे. याप्रकरणी स्थानिक पोलिसांकडे तक्रार नोंदवली असून सध्या पोलीस याप्रकरणी तपास करत आहेत.

मिड डे वृत्तपत्राच्या माहितीनुसार, संबंधित व्यक्तीचे नाव सिद्धांत नरेंद्र असे असून त्यांनी २१ ऑक्टोबर रोजी म्हणजेच मतदानाच्या दिवशी ओनलाईन दारूची ऑर्डर दिली होती. साहजिकच यादिवशी ड्राय डे असल्याने सर्व अधिकृत दुकानातून दारू विक्री बंद होती, पण तरीही सिद्धनात यांनी शोध सुरु ठेवला, अखेरीस त्यांना एक लिंक सापडली ज्यामध्ये दारू उपलब्धीचा पर्याय होता. आश्चर्य म्हणजे या लिंक वर अगदी कमीत कमी दरात दारू उपलब्ध होती.

मुंबई: घरातील इलेक्ट्रॉनिक वस्तू ऑनलाईन पद्धतीने विकण्याच्या नादात महिलेने गमावले 40 हजार

साहजिकच यामुळे उत्साहात येऊन त्यांनी तब्बल 9000 रुपयांच्या दारूची ऑर्डर दिली. यासाठी ऑनलाईन पेमेंटच्या मार्गाने त्यांनी आपल्या क्रेडिट कार्डची माहिती देखील फीड केली. पण यानंतर सबमिट बटण दाबताच त्यांच्या अकाउंट मधून 38हजार रुपये कमी झाल्याचे त्यांच्या लक्षात आले त्याचप्रमाणे ज्या लिंक वर ऑर्डर केली होती ते लिंक सुद्धा बंद झाली.

दरम्यान, आपल्याला फसवल्याचे लक्षात येताचक सिद्धांत यांनी टक्कल खार पोलिसांकडे धाव घेतली आणि याबाबत रीतसर तक्रार नोंदवली. पोलीस सध्या याप्रकरणी तपास करत आहेत. यासोबतच पोलिसांनी नागरिकांना आवाहन करत, ऑनलाईन पेमेंटच्या बाबतीत खबरदारी बाळगण्यास सूचित केले आहे.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif