मुंबई: वाकोला मध्ये मुलीची छेडछाड करणार्‍या व्यक्तीला बेदम मारहाणीत मृत्यू; 5 जणांचा अटक

दरम्यान या मुलांच्या ओळखीमध्ये असलेल्या एका मुलीसोबत छेडछाड केल्याचा आरोप असलेल्या व्यक्तीला कॉलेजच्या मुलांनी बेदम मारलं आहे. त्यामध्ये त्याचा मृत्यू झाला.

Murder | Representational Image | (Photo Credits: Pixabay)

मुंबईच्या वाकोला (Vakola) मध्ये 5 कॉलेजच्या युवकांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. दरम्यान या मुलांच्या ओळखीमध्ये असलेल्या एका मुलीसोबत छेडछाड केल्याचा आरोप असलेल्या व्यक्तीला कॉलेजच्या मुलांनी बेदम मारलं आहे. त्यामध्ये त्याचा मृत्यू झाला. वाकोला पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मयुर गिरीधर जोशी या व्यक्तीने दत्त मंदीर परिसरात राहणार्‍या व्यक्तीवर कमेंट पास केली होती. त्यानंतर मुलीने मित्र मानस मोरे (वय 19) ला फोन करून हकीकत सांगितली. त्याने अजून 4 मित्र बोलावले व जोशीला मारहाण केली. शुक्रवारी तिला मारहाण केल्यानंतर रविवारी उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.

दरम्यान पोलिसांकडे मारहाणीच्या वेळचे सीसीटीव्ही फूटेज मिळाले आहे. या व्हिडिओमध्ये 4-5 जणांनी जोशीला बेदम मारले आहे. हे पाहून त्या कॉलेजच्या मुलांना अटक करण्यात आली आहे. पाचही जणांवर मर्डर आणि दंगल प्रकरणाचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. सध्या यामधेय अधिक तपास सुरू असल्याची माहिती वाकोला पोलिस स्टेशनमध्ये सिनियर इन्स्पेक्टर कैलाश आव्हाड यांनी दिली आहे.

दरम्यान काही महिन्यांपूर्वी बहिणीने पळून जाऊन लग्न केल्यानंतर रागाच्या तिच्या भावाने पुण्याच्या पिंपरी चिंचवडमध्ये राडा घातला होता. त्याने मित्रांसोबत रिक्षांची तोडफोडदेखील केली होती. याप्रकरणी स्थानिक पोलिस स्टेशनमध्ये तपास सुरू होता.