मुंबई: 2000 रुपयांच्या नोटा बघण्याच्या बहाण्याने ताज महल हॉटेलच्या कॅशिअरला चक्क 46 हजारांना गंडवलं

मुंबईतील ताजमहल पॅलेस या पंचतारांकित हॉटेलमध्ये कॅशिअरला गंडवण्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

Image used for representational purpose only | (Photo Credits: PTI)

मुंबईतील ताजमहल पॅलेस (Taj Mahal Palace) या पंचतारांकित हॉटेलमध्ये कॅशिअरला गंडवण्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या घटनेत कॅशिअरसमोर 46 हजार रुपये लंपास केले असूनही त्याचा पत्ताही कोणाला लागला नाही. 20 जानेवारी रोजी ही घटना घडली असून हा सर्व प्रकार कॅमेऱ्यात कैद झाला आहे. याप्रकरणी कुलाबा पोलिस स्टेशनात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीचा शोध सुरु आहे.

1000 दिराम बदलून घ्यायचा बहाणा करत हा इसम ताज महल पॅलेस या हॉटेलमध्ये शिरला. मी युएईचा नागरिक आहे असे सांगून कॉऊंटरवर असलेल्या कॅशिअरकडे त्याने दिराम बदलून देण्याची मागणी केली. मात्र तो इसम हॉटेलमधील गेस्ट नसल्याने कॅशिअरने त्याला पैसे बदलून देण्यास नकार दिला. त्यानंतर काऊंटरवर ठेवलेल्या 2 हजाराच्या नोटा पाहण्याचे निमित्त करत त्यातील चक्क 23 नोटा त्याने लंपास केल्या. त्याच्या या हातचलाखीची चाहूल तेथे उपस्थित महिला कॅशिअरला देखील लागली नाही. (धक्कादायक: तब्बल साडेपाच हजार पुणेकरांची ऑनलाईन फसवणूक; कोट्यावधी रुपयांची चोरी)

ही घटना 20 जानेवारी रोजी दुपारी 4 च्या दरम्यान घडली. कॅशिअर आशिष विजय शिर्के हा त्यावेळेस 2-11 च्या शिफ्टमध्ये काम करत होता. त्यावेळेस या व्यक्तीने आशिषकडे दिराम बदलून देण्याची विनंती केली. पण ही व्यक्ती हॉटेलमध्ये राहत नसल्याने आशिषने दिराम बदलून देण्यास नकार दिला. त्यानंतर 2 हजाराच्या नोटा पाहण्याची त्याला उत्सुकता असल्याने कॅशिअरने त्याला त्या दाखवल्या. त्यानंतर त्याने त्या ठेवल्या व तो निघून गेला, अशी माहिती कॅशिअर आशिषने पोलिसांनी दिली आहे.

मात्र रात्री पूर्ण दिवासाचा हिशोब करताना पैसे कमी असल्याचं कॅशिअरच्या लक्षात आलं. त्यानंतर सीसीटीव्ही फूटेज तपासण्यात आलं. तेव्हा हा प्रकार उघडकीस आला.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif