Mumbai: आतडी हातात घेऊन पोहोचले रुग्णालयात, किरकोळ वादातून जीवघेना हल्ला; डोंबिवलीतील मानपाडा येथील घटना

यात एक तरुण (वय वर्षे 30) गंभीर जखमी झाला. हल्लेखोरांनी  तरुणाच्या पोटात वार करुन आतडी बाहेर काढली. आतडी हातात घेऊन जखमी तरुण रुग्णालयात पोहोचला. सदर घटनेतील आरोपीस पोलिसांनी ताब्यात घेतल्याचे वृत्त आहे.

Image used for represenational purpose (File Photo)

डोबिवली (Dombivli) येथील मानपाडा (Manpada) परिसरात झालेल्या किरकोळ वादातून दोन गटात तुंबळ हाणामारीची घटना घडली आहे. यात एक तरुण (वय वर्षे 30) गंभीर जखमी झाला. हल्लेखोरांनी  तरुणाच्या पोटात वार करुन आतडी बाहेर काढली. आतडी हातात घेऊन जखमी तरुण रुग्णालयात पोहोचला. सदर घटनेतील आरोपीस पोलिसांनी ताब्यात घेतल्याचे वृत्त आहे. पीडित तरुणाचे नाव हर्षद रसाळ असे आहे. तो मंडप डेकोरेटर आहे. तर पंडित म्हात्रे असे आरोपीचे नाव आहे. तो स्थानिक केबल ऑपरेटर असल्याचे समजते. दरम्यान हल्ल्यावेळी हर्षद याला वाचविण्याच्या हेतूने मदत करणारा एक नागरिकही जखमी झाल्याचे समजते. त्याचे नाव समजू शकले नाही.

प्राप्त माहितीनुसार, मानपाडा (डोंबिवली) येथील नेपच्यून हॉस्पिटलजवळ हर्षद यांच्या मिनी ट्रकने म्हात्रे यांच्या कारला रविवारी रात्री धडक दिली. या वेळी  म्हात्रे  आपल्या  वाहनातून बाहेर आले आणि त्यांनी हर्षदला आव्हान दिले. दरम्यान, हर्षदचे काका बंडू रसाळ यांनी वाहनातून उतरून म्हात्रे यांच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला. तसेच, नुकसान भरपाईची देण्याची कबूल केले. पण म्हात्रे यांनी जोरदार वाद सुरू केला, वादाचे पर्यवसान हाणामारीत झाले,असे मानपाडा पोलीसांनी म्हटले आहे. (हेही वाचा, Crime: रात्रीच्या जेवणासाठी बिर्याणी न बनवल्याने दारूच्या नशेत पतीचा पत्नीवर चाकूहल्ला)

दरम्यान,  आरोपीने 3 जणांना फोन केला. काही वेळातच तीन जण घटनास्थळी आले आणि त्यांनी हर्षद आणि बंडू यांना मारहाण करण्यास सुरुवात केली. हर्षदने मारामारी केल्यावर म्हात्रे 'आता मी कोण आहे ते दाखवतो" असे ओरडत त्याच्या गाडीकडे धावला. त्याने चाकू काढला आणि हर्षदवर दोन वार केले. त्याचे आतडे बाहेर आले आणि त्याला रक्तस्त्राव सुरू झाला', असे पोलिसांनी सांगितले.

रस्त्यावरच हा प्रकार सुरू असल्याने लोकांची गर्दी जमली. त्यांच्यापैकी काहींनी हर्षदला मदत करण्याचा प्रयत्न केला. पण, "म्हात्रे यांनी चाकूने उगारला आणि कोणतीही मदत न करण्याचा इशारा दिला. तरीही एक प्रवासी पुढे आला, पण म्हात्रेने त्यांची मांडी कापली. दोन्ही जखमींना नेपच्यून नेण्यात आले," अशी माहीती आहे.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif