Kidnaping Over Mobile Phone Dispute: मोबाईल फोनवरुन वाद,अल्पवयीन मुलाचे अपहरण, ₹33,000 च्या खंडणीची मागणी; मालाड येथून चौघांना अटक

Mumbai Crime News, Malad West, Abduction, Mobile Phone Dispute, Malwani Police, Kidnapping Case Mumbai, मुंबई गुन्हे बातम्या, मालाड पश्चिम, अपहरण, मोबाईल फोन वाद, मालवणी पोलिस, अपहरण प्रकरण मुंबई

Kidnaping | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

मुंबई (Mumbai Crime News) येथील मालाड पश्चिम (Malad West) परिसरातील अमानुल्ला अन्सारी या 19 वर्षीय तरुणाचे मोबाईल फोनच्या वादातून (Mobile Phone Dispute) अपहरण (Abduction) केल्याप्रकरणी मालवणी पोलिसांनी (Malwani Police) बुधवारी चार जणांना अटक केली आहे. संशयितांनी पीडिताच्या मावशीकडे 33,000 रुपयांची खंडणी मागितली आणि रक्कम न दिल्यास ठार मारण्याची धमकी दिली. या धक्कादायक प्रकारानंतर कालीमुनिसा खान या 53 वर्षीय महिलेने तिच्या भाच्याच्या अपहरणाची तक्रार (Kidnapping Case Mumbai) करण्यासाठी मालवणी पोलिसांकडे मंगळवारी संध्याकाळी धाव घेतली. त्यानंतर हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला.

टेंपोमधून अपहरण

कालीमुनिसा खान या महिलेने मालवणी पोलिसांना सांगितले की, अपहरणकर्त्यांनी अन्सारीला टेंपोमध्ये कोंडले असून, ऑनलाइन पेमेंट मोडद्वारे खंडणीची मागणी केली आहे. पैशांची व्यवस्था केली नाही तर भाच्याला ठार मारण्याची आरोपींनी धमकी दिल्याचेही तिने पोलिसांना सांगितले. आरोपींनी अन्सारीला मालवणीतील गेट क्रमांक 6 वर जबरदस्तीने टेंपोमध्ये घेतले, त्याचे अपहरण केले आणि घटनास्थळावरुन पळ काढला. त्याचे अपहरण झाले असून, सुरक्षेच्या भीतीने आपण तक्रार देत आहोत, असेही ती म्हणाली. (हेही वाचा, Dispute Over Honeymoon Plans: जोडप्याच्या मधुचंद्राच्या ठिकाणावरुन कौटुंबीक वाद; जावयावर Acid फेकले, कल्याण येथील सासऱ्याचा कारनामा)

पोलिसांकडून पीडिताची सुटका, संशयितांना अटक

महिलेने दिलेल्या माहितीनुसार, पोलिसांनी वरिष्ठ निरीक्षक शैलेंद्र नागरकर यांच्या नेतृत्वाखालील पथक स्थापन करत तपास सुरु केला. तपासादरम्यान आरोपींनी खानला केलेल्या फोन कॉलचा मागोवा घेतला. पोलिसांनी कारवाई करत गोरेगावच्या राम मंदिर परिसरातून अभिषेक सिंग, अजय पांडे, प्रदीप सिंग आणि अन्वर खान या चार संशयितांना अटक केली. जिथे हा टेम्पो उभा होता. अन्सारीला आरोपींच्या तावडीतून सुखरूप वाचवण्यात आले. (हेही वाचा, Mumbai: उत्तर प्रदेशातील 4 वर्षीय मुलाचे अपहरण केल्या प्रकरणी जोडप्यावर गुन्हा दाखल, पतीला अटक)

मोबाईल फोनवरून वाद आणि 33,000 रुपये

तपासादरम्यान, पीडित अन्सारीने खुलासा केला की तो आरोपी पुरुषांना ओळखत होता. ते सर्व कांदिवलीचे रहिवासी होते. मोबाईल फोन देण्याचे आश्वासन देऊन अन्सारीने त्यांच्याकडून 33,000 रुपये घेतल्याने हा वाद निर्माण झाला. मात्र, त्याने त्या बदल्यात फोन दिलाच नाही. त्यामुळे आरोपी आणि अन्सारी यांच्यात वाद झाल्याची प्राथमिक माहिती आहे. दरम्यान, संशयितांनी अन्सारीला मंगळवारी संध्याकाळी भेटून पैसे परत करण्याची मागणी केली. या वादाचे रूपांतर हाणामारीत झाले, त्याच्या कुटुंबाकडून रक्कम वसूल करण्यासाठी चौघांनी त्याच्यावर हल्ला केला आणि त्याचे अपहरण केले.

कायदेशीर कारवाई

मालवणी पोलिसांनी अपहरण आणि गुन्हेगारी धमकीसाठी भारतीय दंड संहितेच्या (आयपीसी) संबंधित कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे. संशयितांना ताब्यात घेण्यात आले असून पुढील तपास सुरू आहे.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif