Maharashtra ATS ची कारवाई; मुंबईच्या जोगेश्वरी मधून एका संशयिताला अटक
यामध्ये उत्तर प्रदेश, महाराष्ट्र आणि दिल्लीत दहशतवादी हल्ला करण्याचा त्यांचा घाट होता
महाराष्ट्र एटीएस (Maharashtra ATS) आणि मुंबई क्राईम ब्रांच (Mumbai Crime Branch) कडून काल (17 सप्टेंबर) रात्री मुंबईच्या जोगेश्वरी मध्ये एका व्यक्तीला अटक करण्यात आली आहे. जाकीर असं या व्यक्तीचं नाव असून त्याचा संबंध काही दिवसांपूर्वी दिल्ली पोलिसांनी अटक केल्या अतिरेकी हल्ला संबंधींसोबत सोबत असल्याचा अंदाज आहे. दरम्यान ही व्यक्ती अंडरवर्ल्डशी देखील संबंधित असल्याचं म्हटलं जात आहे. जाकीरने जान मोहमदला मुंबईत हत्यार आणण्यासाठी सांगितल्याचा पोलिसांना संशय आहे.
भारतामध्ये मोठा बॉम्बस्फोट घडवून आणण्याचा कट मागील आठवड्यात दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाने उधळला आहे. यामध्ये उत्तर प्रदेश, महाराष्ट्र आणि दिल्लीत दहशतवादी हल्ला करण्याचा त्यांचा घाट होता. दिल्ली पोलिसांनी 14 सप्टेंबरला 6 दहशतवाद्यांना अटक केली आहे. त्यापैकी एक मुंबईच्या धारावीचा होता. समीर कालिया उर्फ जान मोहम्मद शेख याला राजस्थानमधून ताब्यात घेण्यात आलं होतं. नक्की वाचा: Mumbai ATS: जान मोहम्मद शेख याचे 20 वर्षांपासून अंडरवर्ल्डशी संबंध, मुंबईत रेकी झाली नाही; मुंबई एटीएसचा महत्त्वपूर्ण खुलासा.
जान मोहम्मद हा महाराष्ट्र एटीएस च्या रडार वर होता .त्याला 13 सप्टेंबर रोजी मुंबई सेंट्रल रेल्वे स्थानकावरुन दिल्लीला गेला. त्याचा दाऊद गँगसोबत संबंध होता. 20 वर्षांपूर्वी जान मोहम्मदवर मुंबईच्या पायधुनी पोलीस ठाण्यात गोळीबार, तोडफोड, चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता, अशी माहिती समोर आली आहे.