मुंबई: UP चे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना बॉम्बने उडवण्याची धमकी देण्याबाबत चुनाभट्टी परिसरातून 25 वर्षीय तरूण महाराष्ट्र ATS कडून अटकेत!
मुंबई शहरातील चुनाभट्टी भागातून कमरान आमिन खान (Kamran Amin Khan) या 25 वर्षीय तरूणाला उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या हत्येचा कटाबाबत कथित धमकी देणारा कॉल केल्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे
मुंबई शहरातील चुनाभट्टी (Chunabhatti) भागातून कमरान आमिन खान (Kamran Amin Khan) या 25 वर्षीय तरूणाला उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Uttar Pradesh CM Yogi Adityanath) यांच्या हत्येचा कटाबाबत कथित धमकी देणारा कॉल केल्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे. काल (23मे) च्या दुपारी ही अटक झाली असून उद्या (25 मे) दिवशी मुंबईतील कोर्टामध्ये त्याला दाखल केलं जाणार आहे. ही कारवाई महाराष्ट्र अॅन्टी टेरिरिझम स्क्वॉडने (Maharashtra ATS) केली आहे. दरम्यान लखनौ पोलिसांकडून गोमती नगर पोलिस स्थानकामध्ये या प्रकरणी FIR दाखल करण्यात आली असून संबंधित संशयित व्यक्ती मुंबईमध्ये असल्याची माहिती Maharashtra ATS ला कळवण्यात आली होती. अटकेनंतर त्याचा ताबा UP Special Task Force कडे देण्यात आला आहे.
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या बद्दल करमान खानच्या मनात राग होता. यामधूनच त्याने योगी आदित्यनाथ यांना बॉम्बने उडवून देण्याची धमकी दिली होती. 22 मेला व्हॉट्सअॅपवर आलेल्या या फोन कॉलमुळे उत्तर प्रदेश सह देशभरात खळबळ माजली होती. मात्र पोलिसांनी कसून तपास केल्यानंतर या फोन कॉलचे कनेक्शन महाराष्ट्रामध्ये मिळाले आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार कमरान खान हा सिक्युरिटी गार्ड म्हणून मुंबईमध्ये काम करत होता. चुनाभट्टीचा रहिवासी असून त्याला काळाचौकी परिसरातून अटक करण्यात आली आहे.
ANI Tweet
उत्तर प्रदेश मध्ये गोमतीनगर पोलिस स्टेशनमध्ये अज्ञात व्यक्तीविरूद्ध यापूर्वीच आयपीसी कलम 505(1)/(b),506 आणि 507 अंतर्गत पोलिस अधिकारी धीरज शुक्ला यांनी एफआयआर दाखल केली आहे.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)