Mumbai Maha Vikas Aghadi Mega Rally: मुंबईमध्ये उद्या होणार महाविकास आघाडीची मेगा रॅली; वाहतूक पोलिसांनी जाहीर केले वाहतुकीमधील बदल
याबाबत मुंबई वाहतूक पोलिसांनी माहिती दिली आहे.
Mumbai Maha Vikas Aghadi Mega Rally: उद्या, म्हणजेच 6 नोव्हेंबर 2024 रोजी महाविकास आघाडीच्या (Maha Vikas Aghadi) वतीने एमएमआरडीए. मैदान, बांद्रा कुर्ला कॉम्पलेक्स, बांद्रा पूर्व मुंबई या ठिकाणी जाहिर सभा घेण्यात येणार आहे. सदर सभेकरिता महाविकास आघाडीचे नेते, पदाधिकारी व कार्यकर्ते हे महाराष्ट्रातील वेगवेगळया भागातून मोठ्या संख्येने हजर राहणार आहेत. त्यामुळे बीकेसी मधील एमएमआरडीए मैदान परिसरात लोकांची मोठया प्रमाणात गर्दी होवून, त्याचा परिणाम वाहतूकीवर होणार असल्याने, वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी तसेच अतिमहत्वाच्या व्यक्तीच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने काही मार्ग वाहतूकीसाठी बंद करून, त्या मार्गावरील वाहतूक ठराविक कालावधीकरिता इतरत्र वळवण्यात येत आहे. याबाबत मुंबई वाहतूक पोलिसांनी माहिती दिली आहे.
दिनांक 6 नोव्हेंबर 2024 रोजी दुपारी 3 ते रात्री 11 वाजेपर्यंत खालीलप्रमाणे मार्ग वाहतूकीसाठी तात्पुरत्या स्वरूपात आवश्यकतेनुसार प्रतिबंध करण्यात येत आहेत.
पश्चिम दृतगती महामार्ग, धारावी, वरळी सिलींककडून कुर्लाच्या दिशेने जाणाऱ्या सर्व वाहनांना भारत नगर जंक्शन कडून पुढे कुर्ल्याच्या दिशेने जाण्याकरिता प्रवेशबंदी राहील.
पर्यायी मार्ग-
भारत नगर जंक्शन येथुन उजवे वळण घेवुन सेबी जंक्शन - वन बीकेसी उजवे वळण - कॅनरा बँक जंक्शन डावे वळण एमसीए क्लब - अमेरीकन वकालत जंक्शन टाटा कम्युनिकेशन डावे वळण घेवुन एमटीएनएल जंक्शन वरुन कुर्ला कडे मार्गस्थ होतील.
वाहतूकीसाठी बंद मार्ग-
संत ज्ञानेश्वर मार्ग वरुन कुर्लाच्या दिशेने जाणाऱ्या सर्व वाहनांना भारत नगर जंक्शन कडून पुढे कुर्ल्याच्या दिशेने जाण्याकरिता प्रवेशबंदी राहील.
पर्यायी मार्ग-
भारत नगर जंक्शन येथुन उजवे वळण घेवुन सेबी जंक्शन - वन बीकेसी उजवे वळण - कॅनरा बँक जंक्शन डावे वळन - एमसीए क्लब - अमेरीकन वकालत जंक्शन - टाटा कम्युनिकेशन डावे वळन घेवुन एमटीएनएल जंक्शन - रजाक जंक्शन - मुंबई विद्यापीठ - हंसभुग्रा जंक्शन डावे वळण घेवुन पश्चिम दृतगती महामार्गाने शासकीय वसाहत खेरवाडी बांद्रा पुर्व कडे मार्गस्थ होतील.
वाहतूकीसाठी बंद मार्ग-
खेरवाडी शासकीय वसाहत कनाकीया पॅलेस, युटीआय टॉवरकडून पुढे बीकेसी परिसर, चुनाभट्टी तसेच कुर्ल्याच्या दिशेने जाण्याकरिता प्रवेशबंदी राहील. (हेही वाचा: Sharad Pawar यांचे महाराष्ट्र विधानसभा मतदानाच्या तोंडावर संसदीय राजकारणातून निवृत्तीचे संकेत? 'आता कोणतीच निवडणूक लढणार नाही')
पर्यायी मार्ग-
गुरूनानक हॉस्पीटल डावे वळण मुंबई बँक - इनकम टॅक्स जंक्शन - एनएसई भारत नगर जंक्शन येथुन उजवे वळण घेवुन सेबी जंक्शन बीकेसी - कनेक्टर जंक्शन येथून कुर्ला व चुनाभट्टीकडे मार्गस्थ होतील.
वाहतूकीसाठी बंद मार्ग-
कुर्ला व रजाक जंक्शन वरुन पश्चिम दृतगती महामार्ग, धारावी, वरळी सिलींक च्या दिशेने जाणाऱ्या सर्व वाहनांना प्लॅटीना जंक्शन ते भारत नगर जंक्शनपर्यंत जाण्याकरिता प्रवेशबंदी राहील.
पर्यायी मार्ग-
प्लॅटीना जंक्शन येथून यु-टर्न घेवून एमटीएनएल जंक्शन उजवे वळण टाटा कम्युनिकेशन उजवे वळण अमेरीकन वकालत जंक्शन एमसीए क्लब, कॅनरा बँक जंक्शन - एनएसई जंक्शन - पुढे फॅमिली कोर्ट जंक्शन येथून पश्चिम दृतगती महामार्ग - धारावी व वरळी सिलींक कडे मार्गस्थ होतील.
वाहतूकीसाठी बंद मार्ग-
सीएसटी रोड हा वाहतूकीकरिता बंद करण्यात येत आहे.
पर्यायी मार्ग-
सीएसटी रोडने एमटीएनएल जंक्शन येथुन पुढे टाटा कम्युनिकेशन उजवे वळण अमेरीकन वकालत जंक्शन - एमसीए क्लब- कॅनरा बॅक जंक्शन - एनएसई जंक्शन डावे वळण घेवुन पश्चिम दृतगती महामार्ग- कलानगर जंक्शन -भास्कर कोर्ट जंक्शन - खेरवाडी जंक्शन येथून मार्गस्थ होतील.