Mumbai Local Update: मुंबई लोकल ट्रेन्स लवकरच पूर्ण क्षमतेने धावणार

मागील वर्षी मार्चमध्ये झालेल्या लॉकडाऊनमध्ये लोकल सेवा पूर्णपणे स्थगित करण्यात आली होती आणि अनलॉक प्रक्रीयेदरम्यान लोकल सेवा टप्प्याटप्प्याने पुन्हा सुरु करण्यात आली.रे

Mumbai Local Train | Representational Image | (Photo Credits: PTI)

मुंबईकरांची लाईफलाईन असलेली मुंबई लोकल (Mumbai Local) लवकरच पूर्ण क्षमतेने (Full Capacity) धावणार आहे. मागील वर्षी कोरोना संकटामुळे मार्चमध्ये झालेल्या लॉकडाऊनमध्ये लोकल सेवा पूर्णपणे स्थगित करण्यात आली होती आणि अनलॉक प्रक्रीयेदरम्यान लोकल सेवा टप्प्याटप्प्याने पुन्हा सुरु करण्यात आली. मात्र आता लवकरच लोकल सेवा पूर्ण क्षमतेने सुरु करण्याचा निर्णय विचाराधीन आहे. (Mumbai Local Update: 18 वर्षांखालील सर्व विद्यार्थ्यांना मुंबई लोकल प्रवासाची मुभा)

"सध्या पश्चिम रेल्वे मार्गावर दिवसाला 1300 ट्रेन्स धावतात. हा आकडा आता वाढवून 1367 पर्यंत नेण्याचा पश्चिम रेल्वे अधिकाऱ्यांचा मानस आहे. लोकल ट्रेन्स संदर्भात सरकारकडून अंतिम निर्णय येणे अजून बाकी आहे. परंतु, लवकरच लोकल्स ट्रेन्स पूर्ण क्षमतेने धावण्याची शक्यता आहे," असे पश्चिम रेल्वे अधिकाऱ्याने फ्री प्रेस सोबत बोलताना सांगितले. तर "लोकल सेवा पूर्ण क्षमतेने सुरु करण्यासंदर्भातील अंतिम प्लॅन रेल्वे मुख्यालयाकडे पाठवण्यात आला असून त्यावरील निर्णयाची सध्या प्रतिक्षा आहे," असे मध्य रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.

पूर्णपणे लसीकरण झालेल्या व्यक्तींना प्रवासाची मुभा दिल्यानंतर लोकल्स ट्रेन्सच्या संख्येत वाढ करण्यात आली होती. 16 ऑगस्ट नंतर पश्चिम रेल्वेमध्ये प्रत्येक दिवसाला 1201 ट्रेन्स तर मध्य रेल्वे मध्ये 1612 ट्रेन्स धावत होत्या.

सध्याचा काळ हा सणासुदीचा असून या काळात प्रवास करणाऱ्या नागरिकांची संख्या वाढणार आहे. त्यामुळे लोकल सेवा पूर्ण क्षमतेने चालवण्यात आली तर प्रवाशांसाठी ते सोयीस्कर ठरेल. त्याचबरोबर रेल्वे प्रशासनालाही याचा फायदा होईल. दरम्यान, सध्या कोरोना लसीचे दोन्ही डोस घेतलेल्या नागरिकांनाच लोकल प्रवासाची मुभा देण्यात आली आहे.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif