Mumbai Local Trains Update: आज मध्य रेल्वेच्या वाहतूकीचे वेळापत्रक पाहा

तसेच मुंबईची लाईफलाईन ओळखल्या जाणाऱ्या लोकलवर पावसामुळे परिणाम झाला आहे.

Mumbai local train | Representational Image | (Photo Credits: PTI)

मुंबईत (Mumbai) गेल्या तीन-चार दिवसांपासून मुसळधार पावसाच्या सरी कोसळत आहे. तसेच मुंबईची लाईफलाईन ओळखल्या जाणाऱ्या लोकलवर पावसामुळे परिणाम झाला आहे. तर गेल्या दिवसात लोकल विस्कळीत झाल्याने रेल्वेस्थानकात प्रवाशांचा खोळंबा झालेला दिसून येत आले. परंतु आज मध्य रेल्वेची वाहतूक रविवारच्या वेळापत्रकानुसार सुरु राहणार आहे.

पुढील 24 तासात अधिक जोरदार पाऊस पडणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यात मध्य रेल्वेची वाहतूक दमदार पावसामुळे नेहमीच विस्कळीत होते. तर जाणून घ्या आज मध्य रेल्वेवरील लोकलचे वेळापत्रक कसे असणार आहे. (हेही वाचा-Malad Wall Collapse Incident: मालाड दुर्घटनेत 21 जणांचा नाहक बळी, जखमींची संख्या पोहचली 78 वर, अग्निशमन दलाचे बचावकार्य अद्याप सुरु)

लांब पल्ल्याच्या गाड्यांचे वेळापत्रक:

मध्य रेल्वे मार्गावर धावणाऱ्या लोकल गाड्यांच्या फेऱ्यांची संख्या आज कमी ठेवण्याचा निर्णय मुंबई रेल्वे प्रशासनाने घेतला आहे. हवामान विभागाने दिलेल्या अतिवृष्टीच्या इशाऱ्यानंतर मध्य रेल्वे प्रशासनाने हा निर्णय घेतला. त्यामुळेआज मध्य रेल्वे मार्गावरील लोकल गाड्या तुलनेत कमी असतील.