IPL Auction 2025 Live

Mumbai Local Trains New Dashcams: मुंबई लोकल ट्रेन्सचा नवीन डॅशकॅम टाळू शकेल मृत्यूचा धोका

त्यामुळे आक्षेपार्ह गोष्टी करणाऱ्या समाजकंठकांची ओळख पटवण्यास मदत होईल.

Mumbai Local | Representational Image (Photo Credits: Pixabay)

मुंबई लोकल ट्रेन्स (Mumbai Local Trains) आता नव्या डॅशकॅम्स (Dashcams ) फिचर्सने युक्त होत आहेत. डॅशकॅम्स फिचर्समुळे (Dashcams Feature) मुंबई लोकल ट्रेन्स मार्गांवर होणारे अपघात, मृत्यू आदींचे प्रमाम कमी होण्यास मदत होणार आहे. रेल्वे रुळ ओलांडताना आणि फलाटावर आल्यावर रेल्वेतून चढता-उतरताना प्रामुख्याने अनेक प्रवाशांचे मृत्यू होतात. लोकलमधून पडून मृत्यू होणाऱ्यांचे प्रमाणही मोठे आहे. हे मृत्यू रोखण्यासाठी हा नवा डॅशकॅम (Mumbai Local Trains New Dashcams) कामी येणार आहे.

कोचमधील कॅमेरे अन्यायकारक घटना आणि आपत्कालीन परिस्थितीचा मागोवा ठेवण्यात मदत करतील. शहरातील रेल्वे अपघातात दररोज सुमारे 10 ते 11 जणांचा मृत्यू होतो. अधिकाऱ्यांनी पुढे अधिक माहिती देताना सांगितले की रेल रोको, रास्तारोको किंवा इतर आंदोलने, मोर्चे, बंद अशा वेळी होणारा हिंसाचार, दगडफेक आणि सरकारी मालमत्तेचे नुकसान अशा घटनांचे सीसीटीव्ही फुटेज या नव्या प्रणालीमुळे उपलब्ध होईल. त्यामुळे आक्षेपार्ह गोष्टी करणाऱ्या समाजकंठकांची ओळख पटवण्यास मदत होईल. (हेही वाचा, मुंबई: बोरीवली, मालाड सांताक्रूज रेल्वे स्टेशन्स चे पालटले रुप, स्थानकांवर रेखाटण्यात आली सुंदर चित्रे, See Pics)

एका वरिष्ठ अधिकाऱ्याच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तात मिड डेने म्हटले आहे की, या नव्या ट्रेनला 'Uttam Rake' असे संबोधण्यात येत आहे. या प्रणालीमध्ये लोकलच्या हेडलाईट जवळ दोन्ही कॅबमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे आहेत. जेणेकरुन मोटरमन समोरच्या बाजूस लक्ष ठेवू शकेल आणि गार्ड मागील भागाचा मागोवा घेऊ शकेल. सर्व सीसीटीव्ही आहेत एकमेकांना कनेक्ट आहेत, असेही हा अधिकारी म्हणाला.

दरम्यान, या लोकलमध्ये अलार्म चेन, एलईडी दिवे आणि इतरही आवश्यक माहिती अॅपद्वारे देण्यात आली आहे. लोकल्सचे सौंदर्य आणि इतरही गोष्टींवर लक्ष ठेऊन हे डिजाईन बनविण्यात आले आहे.