Mumbai Local Train Update: मध्य रेल्वे 3 जानेवारीपासून सरू करणार AC Locals, जाणून घ्या टाईमटेबल
मुंबईमधील सर्व 16 AC लोकल ट्रेन (AC Locals Trains) मुंबईच्या ट्रान्स-हार्बर रेल्वे मार्गावरून काढल्या जात आहेत. मध्य रेल्वेने हा निर्णय घेतला आहे
मुंबईमधील सर्व 16 AC लोकल ट्रेन (AC Locals Trains) मुंबईच्या ट्रान्स-हार्बर रेल्वे मार्गावरून काढल्या जात आहेत. मध्य रेल्वेने हा निर्णय घेतला आहे. आता या सर्व सेवा सीएसएमटी ते गोरेगाव/वाशी/पनवेल/वांद्रे हार्बर मार्गावर चालवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 3 जानेवारीपासून या सर्व सेवा आता हार्बर मार्गावर धावणार आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, ट्रान्सहार्बर मार्गावर आता फक्त नॉन-एसी लोकल चालवल्या जातील. ट्रान्सहार्बर मार्गावरील एसी लोकलला प्रवाशांच्या मिळालेल्या थंड प्रतिसादानंतर मध्य रेल्वेने हा निर्णय घेतला आहे.
जाणून घ्या या एसी रेल्वेचे वेळापत्रक -
98802 – B-2 Bandra Dep 04.17 hrs CSMT Arr 04.48 hrs
98011 – PL-9 CSMT Dep 04.52 hrs Panvel Arr 06.12 hrs
98022 – PL-22 Panvel Dep 06.29 hrs CSMT Arr 07.48 hrs
98815 – B-15 CSMT Dep 07.51 hrs Bandra Arr 08.20 hrs
98818 – B-18 Bandra Dep 08.28 hrs CSMT Arr 08.58 hrs
98723 – GN-23 CSMT Dep 09.02 hrs Goregaon Arr 09.56 hrs
98730 – GN-30 Goregaon Dep 10.06 hrs CSMT Arr 11.04 hrs
98523 – V-21* CSMT Dep 11.08 hrs Vashi Arr 11.57 hrs
98556 – V-44 Vashi Dep 16.44 hrs CSMT Arr 17.33 hrs
98759 – GN-59* CSMT Dep 17.37 hrs Goregaon Arr 18.31 hrs
98766 – GN-66* Goregaon Dep 18.41 hrs CSMT Arr 19.40 hrs
98553 – V-49* CSMT Dep 19.44 hrs Vashi Arr 20.34 hrs
98578 – V-64* Vashi Dep 20.49 hrs CSMT Arr 21.38 hrs
98241 – PL-189 CSMT Dep 21.42 hrs Panvel Arr 23.02 hrs
98244 – PL-198 Panvel Dep 23.13 hrs CSMT Arr 00.32 hrs
98803 – B-3 CSMT Dep 00.36 hrs Bandra Arr 01.04 hrs
लक्षात घ्या, या एससी लोकल सेवा रविवार/सुट्टीच्या दिवशी उपलब्ध नसतील.
दरम्यान, यापूर्वी मुंबईत रेल्वेकडून काही वातानुकूलित लोकल चालवल्या जात असल्याची बातमी आली होती. मुंबईतील ठाणे ते दिवा रेल्वे स्थानकांदरम्यान पाचवा आणि सहावा रेल्वे मार्ग सुरू केल्यानंतर आता मुंबईकरांना आणखी सुविधा देण्याची तयारी मध्य रेल्वेने केली आहे. त्याअंतर्गत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, कर्जत, कसारा आणि खापोली रेल्वे स्थानकांदरम्यान आणखी एसी लोकल फेऱ्यांचे नियोजन करण्यात येत आहे.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)