मुंबई: मध्य रेल्वेची वाहतुकीत पुन्हा एकदा दिरंगाई; गाड्या धावतायत 15 ते 20 मनिटे उशीरा

नेमकी याच वेळी वाहतूकसेवा विस्कळीत झाली. त्यामुळे मध्य रेल्वेवरुन प्रवास करणाऱ्या मुंबईकर (Mumbaikar) प्रवाशांचा खोळंबा झाला आहे. अचानक घडलेल्या या प्रकारामुळे प्रवाशांची अडचण झाली असून, त्यांना मनस्ताप सहन करावा लागतो आहे तो वेगळाच.

Central Railway Mumbai | (Photo Credits: Archived, Edited, Representative image)

Mumbai Local Train Status Updates: मध्य रेल्वे (Central Railway) सेवेचे गेल्या काही दिवसांपासून सुरु झालेले वाहतूक दिरंगाईचे रडगाणे आज (19 जून 2019) पुन्हा पाहायला मिळत आहे. आज सकाळी साडेसहाच्या सुमारास कर्जत रेल्वे स्टेशन जवळ अहमदनगर पुणे रेल्वेला काही त्रांत्रिक बिघाड झाला. त्याचा परिणाम मध्य रेल्वेच्या वाहतुकीवर झाला. मध्य रेल्वेवरुन धावणाऱ्या गाड्या 15 ते 20 मनिटे उशीराने धावत असल्याची माहिती स्टेशनवरील प्रवाशांनी दिली आहे.

दरम्यान, या वाहतूक दिरंगाईबद्धल रेल्वे प्रशासनाकडून अद्याप कोणताही दुजोरा मिळाला नाही. स्टेशनवर मात्र प्रवाशांची गर्दीच गर्दी पाहायला मिळत आहे. गेल्या काही दिवसांपासून मध्य रेल्वे वाहतूकीत दिरंगाई होत असल्याने प्रवासी संतापले आहेत. रेल्वे गाड्या वेळेवर धावाव्यात गाड्यांचे वेळापत्रक कोलमडू नये यासाठी रेल्वे प्रशासनही चांगले प्रयत्न करत आहे. मात्र, त्याला अद्याप तरी यश येताना दिसत नाही. (हेही वाचा, मुंबई: मध्य रेल्वे वाहतूक विस्कळीत होण्याचे रडगाणे पाचव्या दिवशीही सुरुच, प्रवाशांचे हाल, स्थानकांवर गर्दीच गर्दी)

सकाळची वेळ म्हणजे मुंबईकरांचा ऑफीस आणि इतर कामांसाठी घराबाहेर पडण्याची वेळ. नेमकी याच वेळी वाहतूकसेवा विस्कळीत झाली. त्यामुळे मध्य रेल्वेवरुन प्रवास करणाऱ्या मुंबईकर (Mumbaikar) प्रवाशांचा खोळंबा झाला आहे. अचानक घडलेल्या या प्रकारामुळे प्रवाशांची अडचण झाली असून, त्यांना मनस्ताप सहन करावा लागतो आहे तो वेगळाच.